दरवेळी साईट पोस्टिंग देऊन डावलले , वरिष्ठ अधिकारी संजय पांडे यांची नाराजी ; मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविले पत्र


वृत्तसंस्था

मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले. वरिष्ठ अधिकारी संजय पांडे हे असमाधानी असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेसेज आणि पत्राद्वारे नाराजी कळविली आहे. Every time the site posting was disrupted, senior officer Sanjay Pandey was annoyed

परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली तर, संजय पांडे यांना कमी महत्त्वाचे असलेले राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमले आहे.या बदलीमुळे संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. त्यात त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. क्षमता असूनही दरवेळी साईट पोस्टिंग देण्यात आली. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद मिळाले नाही. आता महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्त असतानाही संधी दिली नाही. माझ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याला ते पद देण्यात आले, अशी नाराजी पांडे यांनी व्यक्त केली.

Every time the site posting was disrupted, senior officer Sanjay Pandey was annoyed

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था