विकासाच्या नावाखाली होणारी हिमालयाची बेफाम मोडतोड वेळीच थांबवा, पर्यावरणतज्ज्ञ चंडीप्रसाद भट्ट

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली ः उत्तराखंडमध्ये विकासाच्या नावाखाली सध्या हिमालयातील जैवव्यवस्थेचे अफाट नुकसान करण्याचे काम सुरू असल्याची टीका मॅगसेसे पुरस्कार विजेते पर्यावरणतज्ज्ञ चंडीप्रसाद भट्ट यांनी केली आहे.Environmentalist Chandi Prasad Bhatt calls for immediate end to Himalayas

काल या राज्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ऋषी गंगा जलविद्युत प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात जीवीतहानीची भिती वर्तविली जात आहे.मुळात या ठिकाणांवर अशा प्रकल्पांची उभारणी करण्यास परवानगीच देता कामा नये, असे मत भट्ट यांनी मांडले आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याची बाब आपण २०१० मध्ये पर्यावरण मंत्रालयाच्या लक्षात आणून दिली होती,

त्यासाठी वेगळे पत्र देखील लिहिले होते, असे भट्ट यांनी म्हटले आहे. हिमालयीन प्रदेशामध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली जात असून ते कोठेतरी थांबायला हवे, असेही भट्ट यांनी नमूद केले.

Environmentalist Chandi Prasad Bhatt calls for immediate end to Himalayas

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*