पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गला दिल्ली पोलिसांचा झटका: दाखल केला गुन्हा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताच्या अंतर्गत बाबीत विनाकारण नाक खुपसणाऱ्या आणि शेतकरी आंदोलनाला ट्विटद्वारे फूस लावणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांना दिल्ली पोलिसांनी झटका दिला आहे. तिच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे.environmental activist Greta Thunberg Delhi Police shock

शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत वादग्रस्त ट्विट करण्याचा धडाका परदेशातील सेलिब्रेटींनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी लावला आहे. त्यात ग्रेटा थनबर्गचा समावेश आहे. तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर कृषी कायद्याला कसा विरोध करायचा याची रुपरेषाच सादर केली होती.परंतु त्या विरोधात जोरदार विरोध झाल्यावर ते ट्विटडिलीट केले होते.परंतु जागरूक नेटकऱ्यांनी तिचे उद्योग सेव्ह करून तिला ट्रोल केल्यानंतर ती तोंडघशी पडली होती.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावरही गीरे तो भी टांग उपर , या उक्तीप्रमाणे एफआयआर दाखल केल्याच्या काही मिनिटांनंतर तिने हे ट्विट केले आहे. त्यात तिने म्हंटले आहे की, “अजूनही शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे रहा. द्वेष, धमक्या दिल्या तरी आंदोलनात बदल होणार नाही. ”

environmental activist Greta Thunberg Delhi Police shock

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*