उर्जामंत्री नितीन राऊत यांची विमानप्रवासाची मजा, एमएसईबीच्या कंपन्यांना सजा, रजिस्ट्रार ऑफ कंपनी अफेअर्सने मागविला तपशील

उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी गेल्या वर्षभराच्या काळात विमानप्रवासाची मजा घेतली. मात्र, त्याची सजा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला (एमएसईबी) होणार आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनी अफेअरर्सने एमएसइबीची व्होल्गींग कंपनी असलेल्या एमएसईबी व्होल्डींग कंपनी लिमीटेट आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी (महाजेनको) यांना नोटीसा दिल्या आहेत. खर्चाचा तपशील देण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत. Energy Minister Nitin Raut’s fun of air travel, punishment of MSEB companies, details sought by Registrar of Company Affairs


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी गेल्या वर्षभराच्या काळात विमानप्रवासाची मजा घेतली. मात्र, त्याची सजा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला (एमएसईबी) होणार आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनी अफेअरर्सने एमएसइबीची व्होल्गींग कंपनी असलेल्या एमएसईबी व्होल्डींग कंपनी लिमीटेट आणि महाराष्ट्र स्टेयर पॉवर जनरेशन कंपनी (महाजेनको) यांना नोटीसा दिल्या आहेत. खर्चाचा तपशील देण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.राज्याचे उर्जा मंत्री असलेले नितीन राऊत गेल्या वर्षभरापासून बिनदिक्कतपणे चार्टर विमान वापरत होते. त्याचे बिल मात्र एमएसईबीला भरावे लागत होते. त्यामुळे आता कंपनी आॅफ रजिस्ट्रारने या खर्चाचा तपशील विचारला आहे.

एका बाजुला एमएसईबी आर्थिक संकटात असल्याचे सांगितले जाते. परंतु,दुसऱ्या बाजुला खात्याचे मंत्री चार्टर्ड फाईल,स्वत:च्या बंगल्याचे नूतनीकरण करत आहेत. त्यासाठीचा खर्च एमएसईबीच्या माथी मारला जात  आहे.

कंपनी ऑफ रजिस्ट्रारने ५ मार्च रोजी एमएसईबीच्या दोन्ही कंपन्यांकडे राऊ त यांच्यासाठी केलेल्या खर्चाचा तपशील मागविला आहे.लॉकडाऊनच्या काळात नितीन राऊत यांनी मुंबई, दिल्ली, औरंगाबाद आणि हैद्राबाद येथे दौरे केले होते. मात्र, हे दौरे शासकीय दाखविण्यात आले. त्यासाठी चार्टर्ड विमानाचे बिल मात्र एमएसइबीला भरावे लागले.

माहितीच्या अधिकारात रवीकुमार वेमुलाकोंडा यांनी एमएसईबी आणि महाजेनको यांच्याकडे झालेल्या खर्चाची मागणी केली होती. एमएसईबी एचसीएलने दोन विमानप्रवासासाठी म्हणून १४.४५ लाख रुपये बिल भरले. महाजेनकोने तीन विमान फेऱ्यासाठी २९.१० लाख बिल भरले.

Energy Minister Nitin Raut’s fun of air travel, punishment of MSEB companies, details sought by Registrar of Company Affairs

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*