हवेतच पडणार शत्रूचे विमान; भारत आणि इस्रायलची संयुक्त निर्मिती

सुरक्षेच्या बाबतीत मोदी सरकार अतिशय दक्ष असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. आता यात आणखी एका यंत्रणेची भर पडली आहे. भारताकडून मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. Enemy planes Will Be Destroyed In the air; Joint creation of India and Israel


विशेष प्रतिनिधी

जेरुसलेम : सुरक्षेच्या बाबतीत मोदी सरकार अतिशय दक्ष असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. आता यात आणखी एका यंत्रणेची भर पडली आहे. भारताकडून मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. भारत आणि इस्रायलने हवाई सुरक्षेसाठी ही यंत्रणा संयुक्‍तपणे विकसित केली आहे. भारतीय सुविधेद्वारे गेल्या आठवड्यात घेतल्या गेलेल्या या चाचणीदरम्यान निकषांची पूर्तता झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे ‘इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज!’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे!.‘एमआरएसएएम’ ही यंत्रणा हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीतील आधुनिक यंत्रणा असून याद्वारे अवकाशातील ५०-७० किलोमीटर उंचीवरील शत्रूचे विमान पाडले जाऊ शकेल, असे तज्ञांनी म्हटले आहे.

‘इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज’ आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात ‘डीआरडीओ’ने संयुक्‍तपणे आणि दोन्ही देशातील संरक्षण कंपन्यांबरोबरच्या भागीदारीतून विकसित केलेल्या या प्रणालीचा वापर दोन्ही देशांच्या लष्कर, कंट्रोल, मोबाइल लॉंचर, ऍडव्हान्स आरएफ सीकरच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या इंटरसेप्टरचाही समावेश आहे.

Enemy planes Will Be Destroyed In the air; Joint creation of India and Israel

एअर डिफेन्स सिस्टममधील प्रत्येक चाचणी अत्यंत गुंतागुंतीची असते आणि कोविड -19 मर्यादेमध्ये या गुंतागुंतीमध्ये लक्षणीय वाढ झाली, असे ‘आयएआय’चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी बोझ लेव्ही यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*