‘ फिर चिनार की शाखों पे पंछी घर बनाएंगे ‘ : कश्मिर खाेऱ्यात पीएम पॅकेजअंतर्गत तरूणांना रोजगार ; कश्मिरी स्थलांतरीतांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकार कटीबद्ध

5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याला असलेला विशेष दर्जा देणारं घटनेशतलं कलम 370 आणि 35A रद्द करण्याचा निर्णय घेतला. या राज्याची पुनर्रचना करून त्याची जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशात विभागणी करण्यात आली. यानंतर आता पंतप्रधानांच्या पॅकेजअंतर्गत नोकरीसाठी 3,800 स्थलांतरीत काश्मिरी काश्मीरमध्ये परतले आहेत. Employment of youth under PM package in Kashmir


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मिरमध्ये कश्मिरी स्थलांतरीतांच्या पुनर्वसनासाठी
पीएम पॅकेजअंतर्गत तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे स्थलांतरीत कश्मिरी आपल्या मुळ ठिकाणी परत येत आहेत.

सरकारने 1990 मध्ये स्थापन केलेल्या मदत कार्यालयाच्या अहवालानुसार, 1990 पासून सुरक्षेच्या कारणास्तव 44,167 काश्मिरी स्थलांतरित कुटुंबांनी काश्मीर खोऱ्यातून स्थलांतर केल्याची नोंद आहे.यापैकी नोंदणीकृत हिंदू स्थलांतरित कुटुंबांची संख्या 39,782 आहे. अशी माहिती केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

गृह-राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार काश्मिरी स्थलांतरितांच्या पुनर्वसनासाठी पीएम पॅकेजअंतर्गत काश्मिरी स्थलांतरित तरुणांसाठी विशेष रोजगार हा एक महत्त्वाचा घटक आहे.
गेल्या काही वर्षांत पीएम पॅकेज अंतर्गत नोकरी मिळविण्यासाठी एकूण 3800 स्थलांतरित उमेदवार काश्मीरमध्ये परत आले आहेत.कलम 370 रद्द केल्यावर, पुनर्वसन पॅकेजअंतर्गत देण्यात येणारी नोकरी घेण्यासाठी तब्बल 520 स्थलांतरित उमेदवार काश्मीरमध्ये परत आले आहेत. वर्ष 2021 मध्ये निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर जवळपास 2,000 स्थलांतरित उमेदवार याच धोरणांतर्गत परत येण्याची शक्यता आहे.काश्मीर खोऱ्यात काश्मिरी स्थलांतरितांचे पुनरागमन व पुनर्वसनासाठी 2008 आणि 2015 मध्ये पंतप्रधानांच्या पॅकेजेस अंतर्गत काश्मिरी स्थलांतरितांचे पुनरागमन व पुनर्वसनासाठी सरकारने धोरण तयार केले आहे.

पंतप्रधान पॅकेजेस अंतर्गत जाहीर केलेल्या एकूण 6000 पदांपैकी सुमारे 3800 काश्मिरी स्थलांतरितांचे सरकारी रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन थेट करण्यात आले आहे. हे कर्मचारी काश्मीर खोर्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत .ज्यात श्रीनगर, बडगाम,बारामुल्ला, शोपियां, कुलगाम, कुपवाडा, पुलवामा, बांदीपोरा, अनंतनाग आणि गांदरबल इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. उर्वरित पदेही भरतीच्या अंतिम टप्प्यात आहेत, असे रेड्डी म्हणाले. घाटीत जम्मू-काश्मीर सरकारमध्ये नोकरी घेत असलेल्या 6000 काश्मिरी स्थलांतरितांसाठी रहदारी व्यवस्था तयार केली जात आहे.

काश्मिर खोर्यातील विविध जिल्ह्यांमध्ये काश्मिरी प्रवासी कर्मचार्‍यांसाठी अंदाजे 920 कोटी रुपये खर्चून 6000 ट्रान्झिट निवास युनिट्स बांधली जात आहेत. आतापर्यंत, 1,025 निवासी घरे बांधण्यात आली आहेत, असे मंत्रालयाने आपल्या उत्तरात नमूद केले.

दरम्यान , जी किशन रेड्डी यांनी सांगितले की जम्मू-काश्मीरमधील गृह प्रमाणपत्रासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत एकूण, 35,44,938 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 32,31,353 लाख लोकांना निवास प्रमाणपत्रे देण्यात आली.

Employment of youth under PM package in Kashmir

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*