इस्लामी मूलतत्ववाद्यांमुळे लोकशाही देशांतल्या एकात्मतेवरआणि कायद्याने चालणाऱ्या समाजावर परिणाम, माजी परराष्ट्र अधिकाऱ्यांचे मदत


इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या हल्यांचे लोकशाही देशांतल्या एकात्मतेवर आणि कायद्याने चालणााऱ्या समाजावर परिणाम होऊ शकतील, असा इशारा भारताच्या परराष्ट्र सेवेतील माजी अधिकाऱ्यांनी दिला आहे. फ्रान्समधल्या हल्यांचा या अधिकाऱ्यांनी निषेध केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इस्लामी मूलतत्त्ववाद्यांच्या हल्यांचे लोकशाही देशांतल्या एकात्मतेवर आणि कायद्याने चालणााऱ्या समाजावर परिणाम होऊ शकतील, असा इशारा भारताच्या परराष्ट्र सेवेती माजी अधिकाऱ्यांनी दिला आहे. फ्रान्समधल्या हल्यांचा या अधिकाऱ्यांनी निषेध केला आहे.

माजी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. या पत्रावर 22 माजी अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. त्यात म्हटले आहे की, भारताने फ्रान्स हल्ल्यांचा निषेध करून अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना पाठिंबा दर्शवला ही अत्यंत योग्य आणि द्विपक्षीय संबंधांना पूरक अशी कृती आहे. त्यामुळे भारतात मॅक्रॉन यांच्या विरोधात वैयक्तिक आणि फ्रान्स देशाविरोधात झालेली निदर्शने मात्र योग्य नाहीत.

फ्रान्समध्ये लोकशाहीची पाळमूळं खोलवर रुतलेली आहेत. या देशाच्या इतिहासामुळे आणि संस्कृतीमुळे तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही नागरिकांच्या नसानसांत भिनलं आहे. फ्रान्समधल्या मुस्लीम नागरिकांना धर्म आणि देश याबद्दलचा दृष्टिकोन वेगळा आहे. तिथल्या संस्कृतीतली अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य यांना वेगळे आयाम आहेत. त्यामुळे कुठल्याही एका संकुचित चष्म्यातून आणि धार्मिक न्यायाने फ्रान्सच्या हल्ल्यांचा विचार करता येणार नाही.

भारताने फ्रान्सच्या अध्यक्षांना पाठिंबा देताना योग्य तीच भूमिका घेतलेली आहे. दहशतवाद हा कुठल्याही स्वरूपाचा असेल तरी त्याचा निषेधच झाला पाहिजे, ही भारताची भूमिका राहिलेली आहे. दुसऱ्या देशाच्या पाठिंब्याने कार्यरत असलेल्या दहशतवादाचा फटका भारताला बसलेला आहे.

भारताचे या सीमेपारच्या दहशतवादाने मोठं नुकसान केलं आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भारताने आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा जागतिक शांतता आणि एकात्मतेला धोकादायक असल्याचं जगापुढे सांगितलं आणि या आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात जग एकवटलं आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी फ्रान्सच्या पाठिशी उभं राहण्याची भारताची भूमिका योग्य आहे. दोन देशांतल्या संबंधांच्या धोरणाला अनुलक्षून असल्याचे प्रतिपादन बुद्धीवाद्यांनी केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था