एल्गार परिषदेला परवानगी, नक्षल समर्थक लेखिका अरुंधती रॉय राहणार उपस्थित


कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीला पुण्यात झालेली एल्गार परिषद कारणीभूत होती. या प्रकरणी एनआयएकडून चौकशीही सुरू आहे. मात्र, तरीही राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा पुण्यात एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे. ३० जानेवरीला होणाऱ्या एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांच्या समर्थक मानल्या जाणाऱ्या लेखिका अरुधंती रॉय उपस्थित राहणार आहेत.


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीला पुण्यात झालेली एल्गार परिषद कारणीभूत होती. या प्रकरणी एनआयएकडून चौकशीही सुरू आहे. मात्र, तरीही राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा पुण्यात एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे.Elgar conference allowed pro-Naxal writer Arundhati Roy will be present

३० जानेवरीला होणाऱ्या एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांच्या समर्थक मानल्या जाणाऱ्या लेखिका अरुधंती रॉय उपस्थित राहणार आहेत. रॉय यांच्यासह काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या निषेधार्थ आयएएस पदाचा राजीनामा देणारे कन्नन गोपीनाथनही परिषदेत उपस्थित राहणार आहे.कोरोनामुळे या परिषदेला केवळ 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेच्या आयोजनाच्या परवानगीसाठी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. त्यावेळी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव परवानगी नाकारली होती. त्यामुळे कोळसे पाटलांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे. परंतु, या परिषदेसाठी अटी-शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे केवळ 200 व्यक्तींनाच पुणे पोलिसांकडून या परिषदेसाठी परवानी देण्यात आली आहे.

त्याचसोबत कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी आयोजकांना घ्यावी लागणार आहे, अशी अटही पुणे पोलिसांना घातली आहे.दरम्यान, ही एल्गार परिषद निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांना 31 डिसेंबर रोजी घ्यायची होती. परंतु, त्यावेळी मात्र या परिषदेसाठी पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर तब्बल एक महिना उलटल्यानंतर पोलिसांकडून ही परवानगी देण्यात आली.

Elgar conference allowed pro-Naxal writer Arundhati Roy will be present

यापूर्वी 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद वादग्रस्त ठरली होती. या परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच, 1 जानेवारी 2018 या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. याप्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. देशभरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते याप्रकरणी अद्यापही तुरुंगात आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी 31 डिसेंबरच्या परिषदेला परवानगी नाकारल्याचं बोलले जात आहे. परंतु, आता 30 जानेवारीला ही परिषद घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था