निवडणूक आयोगाचा कारवाईचा जोरदार दणका, राज्यांत विक्रमी ३३१ कोटी रुपये जप्त


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील चार राज्यांत विधानसभा निवडणुकांचा प्रचार एका बाजूला शिगेला पोहोचला असताना दुसऱ्या बाजूला त्या राज्यांत निवडणूक आयोगाने विक्रमी ३३१ कोटी रुपये जप्त केले आहेत. Election Comission did massive action

२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षाही ही रक्कम मोठी आहे. प्रत्यक्ष निवडणुक सुरू होण्याआधीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जप्त करण्यात आली आहे. तमिळनाडूत सर्वाधिक म्हणजे १२७. ६४ कोटी तर पश्चिम बंगालमधून ११२.५९ कोटी रुपये जप्त केले आहेत.या दोन्ही राज्यांसह आसाम, केरळ व पुदुच्चेरीत काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने २९५ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे, पाच विशेष निरीक्षकही नेमले आहेत. निवडणूक खर्चाच्या अधिक प्रभावी देखरेखीसाठी यापूर्वीच्या कामाचे निर्दोष रेकॉर्ड असलेले अधिकारी नियुक्त केले जातात. कायद्यानुसार निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदारांना रोख रक्कम, भेटवस्तू देण्यास परवानगी नाही.

Election Comission did massive action

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था