एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करा म्हटल्याने अध्यक्षपदावरून हटविले, नरेंद्र पाटील यांचा ठाकरे सरकारवर आरोप


महाराष्ट्रातील ठाकरे सरकार स्वत:पेक्षा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे कार्यक्षम मंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी नेमावे अशी मागणी केल्यानेच आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले, असा धक्कादायक आरोप नरेंद्र पाटील यांनी केली आहे. eknath shinde news


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे सरकार स्वत:पेक्षा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे कार्यक्षम मंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी नेमावे अशी मागणी केल्यानेच आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले, असा धक्कादायक आरोप नरेंद्र पाटील यांनी केली आहे. eknath shinde news

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण कार्यक्षमतेने काम करत नाहीत. त्यामुळेच मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांना हटवून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना अध्यक्ष करा, ही मागणी मी सातत्याने लावून धरल्यामुळेच माझी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावरील नियुक्ती रद्द करण्यात आली, असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

पाटील म्हणाले की, फडणवीस सरकार असताना माझी २०१८ मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ठाकरे-पवार सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर ९ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती बसली आणि त्यानंतर मात्र मी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांवर टीका करण्यास सुरुवात केली. कदाचित हीच बाब त्यांना आवडली नसावी आणि त्यामुळेच अचानक महामंडळातील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या.

पाटील यांची महामंडळावरून उचलबांगडी केल्याने माथाडी कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. बुधवारी वाशी कृषि उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार बंद पाडले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती