खडसेंचा जळफळात कितीही जातीवादावर आला तरी दान द्यायला मुख्यमंत्रीपद खडसेंच्या हातात होते काय?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड करत राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंनी राग फडणवीसांच्या जातीवर काढला खरा, पण तो काढताना दान देण्यासाठी मुख्यमंत्रीपद आपल्या हातात होतेच कुठे याचा विचार न करता वयाच्या सत्तरीत उचलली जीभ आणि लावली टाळ्याला…!! eknath khadse news

२०१४ मधील देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री बनण्याचा प्रवास आणि घटनाक्रम नुसता वरवर जरी बातम्यांच्या आधारे तपासून पाहिला तर लक्षात येते, एकनाथ खडसे हे भाजप श्रेष्ठींचा मुख्यमंत्रीपदासाठी पहिला चॉइस नव्हते. त्यांना निवडणुकीपूर्वी सुरवातीलाच प्रदेशाध्यक्षपदासाठी विचारून झाले होते, त्यावेळी त्यांनी तब्येतीचे कारण सांगून त्यापासून दूर राहणे पसंत केले होते. जे प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीपासून दूर राहिले, त्यांना भाजपच्या १२५ च्या जागा मोदी लाटेत निवडून आल्यावर डायरेक्ट मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडू लागले. ज्येष्ठतेचा मान आठवला आणि त्यांनी तेव्हापासून राजकीय आदळआपट सुरू केली. पाच वर्षांनंतर तिला जातीवादाचे फळ लागले आहे.eknath khadse news

त्यावेळी देखील ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, त्यात खडसे हे नाव माध्यमांमध्ये अनेक नावांपैकी एक म्हणूनच चर्चेत होते. देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चेतले नाव होते. पंकजा मुंडे, विनोद तावडे ही नावे खडसेंच्या आधी चर्चेत होती. त्यावेळी नाही, खडसेंना जातीवाद आठवला. मोदी – शहांनी फडणवीसांची निवड केली, त्यावेळी खडसेंना जातीवादाचे धुमारे फोडण्याची हिंमत झाली नव्हती. आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वळचणीला गेल्यावर त्यांना फडणवीसांची जात आठवली आहे.

फडणवीस, पंकजा मुंडे कोठेही नव्हते, महाराष्ट्राच्या राजकारणात छोटे होते, तेव्हा खडसे राज्याचे भाजपचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कधी जागांची शंभरी सोडा, सत्तरी तरी गाठली होती काय?, शिवसेनेपेक्षा भाजपने जागा जास्त मिळवल्या होत्या काय?, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारात्मक येतात.

eknath khadse news

बाकीचे राहु द्या, जे स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत, ते मुख्यमंत्रीपद ब्राह्मणाला दान दिल्याची भाषा करताहेत, तेही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वळचणीला गेल्यावर, यातच एकनाथ खडसेंची खरी “राजकीय ताकद” समजून येते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था