एकनाथ खडसेंनी उत्तर महाराष्ट्रात जमविलेया मोहमायाबद्दल न बोलणेच बरे


विशेष प्रतिनिधी

नाशिक : पक्षाचा वापर करून सर्व प्रकारची पदे उपभोगणारे,,यथेच्छ मायाजाल जमा करून गर्भश्रीमंती दाखवणारे आणि चोरांच्या उलट्या बोंबाप्रमाणे पक्षावरच नाराजी व्यक्त करणारे नतद्रष्ट नेते म्हणजे एकनाथ खडसे. (eknath khadse news) खडसेंना तुपात घोळा की साखरेत कडू कारल्याप्रमाणे खडसेंची वाणी कडू ती कडूच आणि फटकळ,ताठरही म्हणूनच त्यांच्या या स्वभावामुळेच अनेकजण खडेसंपासूनच दूरावले हेही तितकेच खरे. त्यांच्याबरोबर सध्या असलेले कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांची अवस्था धड इकडे ना धड तिकडे अशी केविलवाणी झाली असून काहीजण गुन्हेगारीच्या बाबतीत हिस्ट्रीसिस्टर असल्याचेही समजते.

सर्व पदे उपभोगणारे खडसे उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते म्हणून परिचित होते, पण अलिकडच्या काळातील त्यांची नाराजी सर्वश्रृत होती. खडसे म्हणातात मी पक्षाचे पूर्वपासून काम करत आलो आहे, त्यामुळे जेष्ठ पदाधिकारी म्हणून मला पक्षाकडे मागण्याचा हक्क आहे, अहो खडसे साहेब आपण पक्षाचे काम केले, पक्ष वाढवला हे खरं आहे.

आपल्याला मागण्याचा हक्क जरूर आहे,पण किती काळ मागत राहणार, सर्वच पदप्रतिष्ठा आपल्याच घरात पाहिजे तर मग भाजपच्या इतर सामान्य कार्यकर्ते,पदाधिकाऱ्याने काय करायचे फक्त पायघड्या,खुर्च्याच उचलायच्या का, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांला वाटले तर त्यात गैर नाही. मूळात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पदे देणे हे केव्हाच बंद करायला पाहिजे होते. खडसेंची पक्षातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांविरूध्दची दादागिरी लक्षात घेऊन त्यांना वरिष्ठांनी कधीच दूर करायला पाहिजे, पण जेष्ठ पदाधिकारी का निर्णय घेत नव्हते हे न सुटणारेच कोडे आहे.

खडसेनी आपणच पक्ष वाढविण्याचा टेंबा सर्वत्र मिरवला. होय त्यांनी उत्तर महाराष्ट्रात पक्ष जरूर वाढवला. पण त्याबद्लयात त्यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कालावधीत मर्जीच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून पक्षांच्या नावाखाली नाशिक,जळगाव,धुळे अशा सर्वच भागात त्यांनी जमवलेली धन,संपत्ती,माया याबद्दल तर विचारायलाच नको, मर्जीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी लाखो नव्हे तर कोट्यवधी रूपयांची माया जमविल्याचे बोलले जात आहे.

eknath khadse news

यापैकी काही अधिकाऱ्यांनी खडसेची चौकशी सुरु झाल्यानंतर तात्काळ नोकरीचा राजीनामा देत,स्वेच्छा निवृत्ती घेत स्वतःसा दूर केले हे उत्तर महाराष्ट्रातील जनता कधीच विसरू शकत नाही. त्यमुळे खडसे भाजप पासून दूर झाले हे एका दृष्टीने चांगलेच झाले. आता तरी भाजपचे काम अधिक जोमाने आणि वेगाने वाढण्यास निश्चित सामान्य कार्यकर्ते,पदाधिकारी प्रयत्न करतील,अशी आशा आहे.

पक्षाला खिंडार वगैरे पडणार नाही-महाजन

भारतीय जनता पार्टी हा विचारांवर चालणारा पक्ष असून व्यक्ती केंद्रीत पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी गेले तर त्याचा काही एक परिणाम भाजपावर पडणार नाही. त्यामुळे एकनाथ खडसे गेल्याने भाजपाला खिंडार पडणार नसून भाजपचे कोणीच त्यांच्यासोबत जाणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरु असल्याची माहिती माजी मंत्री गिरीष महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खडसेंच्या राजीनाम्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. हिच शक्यता गृहीत धरून जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर क्मिटीची आज तातडीची बैठक झाली. त्यावेळी महाजन बोलत होते.या बैठकीत पक्ष संघटन मजबुतीच्या दृष्टीने नेत्यांकडून चाचपणी करण्यात आली. दरम्यान एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपा खासदार रक्षा खडसे या बैठकीला अनुपस्थित होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था