ब्राह्मणांवर खालच्या पातळीवर टीका, खडसेंना राष्ट्रवादीचा वाण नाही पण गुण लागला


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून अद्याप दहा दिवसही उलटले नाहीत तर एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गुण नाही पण वाण लागला. एका ब्राह्मणाला मी मुख्यमंत्रीपदाचं दान दिलं, असं जाहीर वक्तव्य त्यांनी केले आहे. याचा ब्राम्हण महासंघाने निषेध केला आहे. (eknath khadse latest news)


विशेष  प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून अद्याप दहा दिवसही उलटले नाहीत तर एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा गुण नाही पण वाण लागला. एका ब्राह्मणाला मी मुख्यमंत्रीपदाचं दान दिलं, असं जाहीर वक्तव्य त्यांनी केले आहे. याचा ब्राम्हण महासंघाने निषेध केला आहे.

पदवीधर निवडणुकीत याची भरपाई करावी लागेल, असा इशारा देऊन ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे म्हणाले की, दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी, याचे ज्ञान खडसे यांना नसावे याचे आश्चर्य वाटतं. खडसे यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा पुण्यात आल्यानंतर त्यांना याचा जाब विचारण्यात येईल.

खडसेंनी विधान मागे घेऊन माफी मागावी, या मागणीचे आणि निषेधाचे पत्र राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या कार्यालयात देणार आहोत. खडसे यांचा निषेध करुन आमची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची सूचना आम्ही तुपे यांना करणार आहोत. महाराष्ट्रभर सर्वच शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आम्ही अशी पत्रे देणार आहोत, असं दवे यांनी सांगितलं.

eknath khadse latest news

खडसे यांनी वक्तव्य मागे घेतले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला पदवीधर निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, याची जाणीव त्यांनी ठेवावी, असादेखील इशारा दवे यांनी दिला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था