वर्षा राऊत यांना ईडी विचारणार ५५ प्रश्न, येत्या ४८ तासांत चौकशीसाठी हजर राहावे लागणार

पंजाब महाराष्ट्र बॅंक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपीकडून ५५ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. ईडीकडून वर्षा राऊत यांना विचारल्या जाणाऱ्या ५५ प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आहे. ED will ask 55 questions to Varsha Raut, who will have to appear for questioning in the next 48 hours


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंजाब महाराष्ट्र बॅँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपीकडून ५५ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. ईडीकडून वर्षा राऊत यांना विचारल्या जाणाऱ्या ५५ प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आहे.

वर्षा राऊत यांनी पीएमसी घोटाळ्यातील एक आरोपी प्रवीण राऊत याची पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून ५५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. याबाबत वर्षा राऊत यांना उत्तर द्यावे लागणार आहे. ईडीने तयार केलेल्या ५५ प्रश्नांच्या यादीमध्ये वर्षा राऊत यांच्या शिक्षिका म्हणून काम करण्यापासून अनेक गोष्टींचा समावेश आहे.ईडी त्यांना विचारणार आहे की, माधुरी राऊत यांच्याकडून मिळालेल्या पैशाचा स्त्रोत्र काय आहे? ईडीच्या कार्यालयात आल्यावर वर्षा राऊत यांना मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्टअंतर्गत शपथ दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांना लिहून द्यावे लागेल की चुकीचे उत्तर दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

वर्षा राऊत यांची किती किती बॅंकात खाती आहेत? या खात्यांमध्ये किती रक्कम आहे, त्यांनी गेल्या वर्षी आयकर रिटर्न भरले आहेत का? गेल्या दहा वर्षांतील आयकर रिटर्न, त्यांच्या नावावर देशात आणि विदेशात किती संपत्ती आहे? किती कंपन्यांमध्ये त्यांची भागिदारी आहे? त्यांनी किती कंपन्यांच्या संचालक पदावरून राजीनामा दिला आहे? या कंपन्या कोणत्या क्षेत्रात काम करता? आदी प्रश्न त्यांना विचारले जाणार आहेत. सिध्दांत इस्कॉन प्रा. लि. आणि अवनी कन्स्ट्रक्शन्स कंपन्यांशी त्यांचा काय संबंध आहे?

ED will ask 55 questions to Varsha Raut, who will have to appear for questioning in the next 48 hours

माधुरी राऊत यांच्याशी त्यांचे संबंध कसे आले? त्यांनी ५५ लाख रुपयांचे कर्ज का दिले? या कर्जावर काही व्याज दिले जाते का? या कर्जाचे हप्ते त्यांनी चुकविले आहेत का? हे प्रश्नही विचारले जाणार आहेत. आर्थिक अफरातफरीचे मुद्दे उघड होऊ लागल्याने संजय राऊत यांच्यापुढच्या अडचणी वाढल्या आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*