आघाडी सरकारच्या मानगुटीवर भ्रष्टाचाराची जुनी भुते, २५० कोटी रुपयांच्या ठिबक सिंचन घोटाळ्याची ईडीकडून चौकशी होणार

राज्यात पंधरा वर्षे सत्ता भोगलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची जुनी भुते पुन्हा त्यांच्या मानगुटीवर बसू लागली आहेत. आघाडी सरकारच्या काळात २००८ ते २०११ दरम्यान झालेल्या सुमारे २५० कोटी रुपयांच्या ठिबक सिंचन घोटाळ्याची चौकशी ईडीमार्फत होणार आहे. ED to probe Rs 250 crore drip irrigation scam


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात पंधरा वर्षे सत्ता भोगलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळातील जुनी भुते पुन्हा त्यांच्या मानगुटावर बसू लागली आहेत. आघाडी सरकारच्या काळात २००८ ते २०११ दरम्यान झालेल्या सुमारे २५० कोटी रुपयाच्या ठिबक सिंचन घोटाळ्याची चौकशी ईडीमार्फत होणार आहे.

ठिबक सिंचन अनुदानाचा विषय हा कृषी विभागांतर्गत येतो. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने मागील सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळातील ठिबक सिंचन घोटाळ्याचा विषय पुढे आला आहे.कृषी खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी वितरकांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात अनुदान लाटले होते, अशा तक्रारी आहेत. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते. तसेच काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी २०११ च्या विधिमंडळ अधिवेशनात केली होती. या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीच्या आधारे कृषी खात्याच्या दक्षता विभागाकडून ईडीने काही कागदपत्रे मागविल्याची माहिती आहे.

ED to probe Rs 250 crore drip irrigation scam

त्या काळात ठिबक सिंचन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्याऐवजी पुरवठादार कंपन्यांच्या खात्यामध्ये टाकले जात असे. त्यामुळे या पुरवठादार कंपन्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*