आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत सादर यावर्षी जीडीपी 7.7 टक्के घसरण्याचा अंदाज


मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हे तिसरे आर्थिक सर्वेक्षण


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मल सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी आर्थिक बजेट सादर करणार आहेत. त्यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपतींच्या भाषणानंतर लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केलं.Economic Survey presented in the Lok Sabha estimates that GDP will decline by 7.7 per cent this year

आर्थिक सर्वेक्षणात यंदाच्या वर्षी विकास दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पुढील वर्षाचा विकास दरात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.आर्थिक सर्वेक्षणात कोरोना विषाणूच्या साथीच्या आणि ‘लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेत 2021-22 या आर्थिक वर्षात वेगाने पुनरुज्जीवन होण्याची अपेक्षा आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आर्थिक वाढीचा दर 23.9 टक्क्यांनी खाली आला आहे तर दुसऱ्या तिमाहीत तो 7.5 टक्क्यांनी खाली आला आहे.

संपूर्ण आर्थिक वर्षात विकासदर 7.7 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. तर पुढील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी विकास दर 11 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

Economic Survey presented in the Lok Sabha estimates that GDP will decline by 7.7 per cent this year

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती