अर्थचक्र सुरू होण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा सवलतींचा बुस्टर

केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील कोविड प्रतिबंधक क्षेत्रे वगळता इतर ठिकाणी, सर्व व्यवहार नव्याने सुरु करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना, उद्या एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. त्यानुसार अनेक ठिकाणी नव्याने व्यवहार सुरु करण्यासाठीची मोकळीक देण्यात आली आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पाठवलेल्या अहवालांच्या आधारावर आणि सविस्तर चर्चेनंतर या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे अर्थचक्र सुरू होण्यासाठी बुस्टर मिळणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील कोविड प्रतिबंधक क्षेत्रे वगळता इतर ठिकाणी, सर्व व्यवहार नव्याने सुरु करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना, उद्या  एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. त्यानुसार अनेक ठिकाणी नव्याने व्यवहार सुरु करण्यासाठीची मोकळीक देण्यात आली आहे.

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पाठवलेल्या अहवालांच्या आधारावर आणि सविस्तर चर्चेनंतर या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे अर्थचक्र सुरू होण्यासाठी बुस्टर मिळणार आहे.

सिनेमा/थियेटर/मल्टीप्लेक्स यांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्के आसन व्यवस्थेनुसार सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. उद्योग ते उद्योग प्रदर्शन सुरु करण्याची परवानगी आहे. क्रीडापटूंना प्रशिक्षण देण्यासाठीचे जलतरण तलाव सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मनोरंजन पार्क आणि तत्सम जागा सुरु  होऊ शकणार आहेत.

15 ऑक्टोबर नंतर टप्याटप्याने, शाळा-महाविद्यालये, कोचिंग संस्था सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्याची मोकळीक सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे. हा निर्णय, संबधित शाळा, संस्थांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करुन, त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच घेतला जावा.

मात्र विद्यार्थ्यांना कोणत्याही आवडीच्या डिजिटल माध्यमाद्वारे ऑनलाईन/दूरस्थ शिक्षण देणे सुरूच राहील आणि त्याला अधिकाधिक प्रोत्साहन दिले जावे. जिथे शाळा ऑनलाईन वर्ग घेत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाण्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीनेच शिकण्याची इच्छा आहे, त्यांना तसे करण्याची परवानगी देण्यात यावी, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

विद्यार्थी केवळ आपल्या पालकांच्या लिखित परवानगीनेच शाळा/संस्थांमध्ये शिकण्यास येऊ शकतील. उपस्थिती अनिवार्य केली जाऊ नये, पालकांच्या संमतीवरच उपस्थितीचा निर्णय अवलंबून असावा. ज्या शाळा सुरु करण्याची परवानगी दिली जाईल. उच्च शिक्षण संस्थांमध्ये केवळ संशोधन कार्य करणारे विद्यार्थी, पीएचडी करणारे आणि विज्ञान तंत्रज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, ज्यांना प्रयोगशाळांची गरज आहे, त्यांना येत्या 15 ऑक्टोबर 2020 पासून प्रयोगशाळांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांसाठी 15 ऑक्टोबर 2020 नंतर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर 100 पेक्षा अधिक व्यक्तींना मान्यता देण्याची परवानगी देण्यात आली आहे. बंद जागेत सभागृह हॉल क्षमतेच्या कमाल 50% परवानगी दिली जाईल, ज्याची 200 लोकांची कमाल मर्यादा असेल. फेस मास्कचा वापर, योग्य अंतर राखणे, थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था आणि हात धुण्यासाठी सॅनिटायजरचा वापर अनिवार्य असेल. खुल्या जागेत, मैदानाची जागा विचारात घेता/एकंदरीत जागा पाहता, योग्य अंतराची काटेकोर अंमलबजावणी, मास्कचा वापर अनिवार्य, थर्मल स्कॅनिंग आणि हात धुण्यासाठी सॅनिटायजरची व्यवस्था असेल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*