तो ई-मेल माझाच : परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्री कार्यालयाला स्पष्टीकरण

वृत्तसंस्था

मुंबई : पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी केलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून पत्राबाबत शंका उपस्थित केली होती. पण यावर आता परमबीर सिंग यांनी तो इ मेल माझाच आहे, असे सांगून या पत्रावरून सुरु असलेला वाद निकाली काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. e-mail is mine: by Parambir Singh Explanation to the Chief Minister’s Office

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट दिले होते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण, ज्या पत्रावरून राज्यात एवढी मोठी खळबळ उडाली. त्या पत्रावरच शंका उपस्थित केली जात होती.मुख्यंमत्री कार्यालयानं काय म्हटलं होतं? 

परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे ,

त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते.

e-mail is mine: by Parambir Singh Explanation to the Chief Minister’s Office

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*