तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे चक्क ३५ किलोमीटर उलट्या दिशेने धावली

नवी दिल्ली येथून टनकपूर येथे जाणारी पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस अचानक रेल्वे रुळांवरून उलट्या दिशेने तब्बल ३५ किलोमीटर धावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. रेल्वेमध्ये 60 ते 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यांना चकरपूर येथे सुरक्षितरित्या उतरवून बसने त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहे.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथून टनकपूर येथे जाणारी पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस अचानक रेल्वे रुळांवरून उलट्या दिशेने तब्बल ३५ किलोमीटर धावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. रेल्वेमध्ये 60 ते 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यांना चकरपूर येथे सुरक्षितरित्या उतरवून बसने त्यांच्या गावी पाठवण्यात आले आहे.

Due to technical failure, the train ran 35 km in the opposite direction

चंपावत पोलीस अधीक्षक लोकेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णगिरी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चालकाला रेल्वे रुळावरवर प्राणी दिसताच त्याने दुर्घटना टाळण्यासाठी जोरात ब्रेक दाबला. पण यानंतर चालकाचा इंजिनावरील ताबा सुटला आणि संपूर्ण रेल्वे उलट दिशेने धावू लागली. यावेळी रेल्वेचा वेगदेखील सामान्य होता. रेल्वे चकरपूरमध्ये थांबवण्यात आली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.टनकपूर रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे उलट्या दिशेने धावत असल्याची सूचना मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले. तसेच रुळावर जागोजागी छोटे छोटे दगड ठेवण्यात आले. ज्यामुळे रेल्वेचा स्पीड कमी झाला आणि ती थांबवण्यात अखेर यश आले. रेल्वे उलट्या दिशेने धावून लागताच प्रवासी प्रचंड घाबरले होते. या प्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Due to technical failure, the train ran 35 km in the opposite direction

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*