आपला घाबरल्याने कॉंग्रेस योगी आदित्यनाथांनाही मानू लागली देव, सोमनाथ भारतींवर शाई फेकणाऱ्याचा कॉंग्रेस आमदाराने ५१ हजार देऊन केला सत्कार


उत्तर प्रदेशात कॉंग्रेसची पूर्णपणे वाताहत झाल्याचा फायदा घेण्यासाठी पुढे सरसावलेल्या आम आदमी पक्षासोबत लढण्यासाठी आता कॉंग्रेसने हिंदू युवा वाहिनीकडेही मदतीचा हात मागितला आहे. आपचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर रायबरेली येथे शाई फेकण्यात आली. हिंदू युवा वाहिनीच्या जिल्हा संयोजकाचा कॉंग्रेस आमदाराने ५१ हजार रुपये देऊन सत्कार केला. Due to his fear Congress Yogi Adityanath also started believing in God


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशात कॉंग्रेसची पूर्णपणे वाताहत झाल्याचा फायदा घेण्यासाठी पुढे सरसावलेल्या आम आदमी पक्षासोबत लढण्यासाठी आता कॉंग्रेसने हिंदू युवा वाहिनीकडेही मदतीचा हात मागितला आहे. आपचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर रायबरेली येथे शाई फेकण्यात आली. हिंदू युवा वाहिनीच्या जिल्हा संयोजकाचा कॉंग्रेस आमदाराने ५१ हजार रुपये देऊन सत्कार केला.

आपने गेल्या काही दिवसांपासूनउत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाचे नेते संजय सिंह यांच्यानंतर सोमनाथ भारती यांनी उत्तर प्रदेशचा दौरा केला. कॉंग्रेसच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अमेठी आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.रायबरेली येथील दौऱ्यात हिंदू युवा वाहिनीचा संयोजक असलेल्या जितेंद्र सिंह यांनी भारती यांच्यावर शाई फेकली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर भारती यांनाी अपमानजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे चिडलेल्या जितेंद्र सिंह यांनी त्यांच्यावर शाई फेकली. मात्र, भारतीय जनता पक्षापेक्षा याचा जास्त आनंद कॉंग्रेसलाच झाला. कॉंग्रेसचे आमदार राकेश सिंह यांनी जितेंद्र यांच्यासह हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. त्यांचा सत्कार केला. जितेंद्र सिंह यांना ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीसही दिले.

Due to his fear Congress Yogi Adityanath also started believing in God

राकेश सिंह ऐवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोक पूजा करतात. त्यांना देव मानतात. एखाद्या संताप्रमाणे ते काम करत आहेत. त्यांच्याइतका प्रामाणिक मुख्यमंत्री मी आजपर्यंत पाहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या सोमनाथ भारती यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी