ड्रग्जच्या विषयाकडे दुर्लक्ष, बड्यांना वाचविण्याची महाविकास आघाडीची कसरत, भाजपाची टीका

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्जचे कनेक्शन अडीच महिन्यांपूर्वी समोर येऊनही हा गंभीर विषय महाराष्ट्र सरकारच्या नजरेतून सुटला? का सरकारने मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष केले? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राम कदम यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्जचे कनेक्शन अडीच महिन्यांपूर्वी समोर येऊनही हा गंभीर विषय महाराष्ट्र सरकारच्या नजरेतून सुटला? का सरकारने मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष केले? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार राम कदम यांनी केला आहे.

राम कदम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृह मंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचे कनेक्शन आणि व्हॉटसअ‍ॅप चॅट यापूर्वीच पुढे आले होते. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणात बड्या बड्या लोकांना वाचवण्याच्या कसरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही आणि म्हणूनच 65 दिवसांमध्ये कोणाची अटक किंबहुना हा ड्रगचा विषय समोर आला नाही. हा दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सराकारने का करावा?

कदम म्हणाले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास 65 दिवस मुंबई पोलिसांकडे होता. या कालखंडामध्ये ड्रगच्या संदर्भात गंभीर व्हॉट्सअप चॅट उपलब्ध असताना देखील असे कोणते कारण होते की महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले? एवढी महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र सरकारने दडवून का ठेवली ? असे सवाल कदमांनी ठाकरे सरकारला विचारले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*