वृत्तसंस्था
बंगळुरू : अंमली पदार्थ, स्फोटके आणि शस्त्रास्त्रांची तस्करीसाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर केला जात आहे, अशी धक्कादायक माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश आस्थाना यांनी दिली.Drugs, explosives and weapons drones from Pakistan for smuggling
फिक्की या औद्योगिक संघटनेने एरो इंडिया 2021 या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यावेळी आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते .
पंजाब, जम्मू -काश्मीरच्या सीमावर्ती क्षेत्रात पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर केला जात आहे.
त्याद्वारे गेल्या वर्षी 77 वेळा तर 2019 मध्ये 167 वेळा तस्करीसाठी ड्रोन वापरल्याचे उघड झाले आहे. तस्करीबरोबरच टेहळणीसाठी ड्रोनचा सर्रास वापर पाकिस्तानकडून केला जात आहे.
सीमावर्ती भागात 150 किलोमीटर परिसरात टेहाळणी करू शकणारी मानव रहित विमाने खरेदी करण्याची योजना पाकिस्तानी लष्कर आखत असल्याची माहिती आस्थाना यांनी दिली.