Violent Farmers Protest : दिल्लीत पोलिस संयमी भूमिकेत तर शेतकरी संघर्ष पेटवण्याच्या मूडमध्ये पोलिसांनी “घुसखोर” शोधण्यासाठी ड्रोन लावलेत


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. पण शेतकरी आंदोलक तलवारी काढून संघर्ष करण्याच्या मूडमध्ये आहेत.कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.

तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरी, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार आहेत.

आठवडय़ाभरातील चर्चेच्या पाच फेऱ्यांनंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी दिली असली तरी या मोर्चामध्ये घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राजपथावरील पथसंचलन संपल्यानंतर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू होईल. या ट्रॅक्टर मोर्चासाठी दिल्लीच्या सीमांवरील सर्व अडथळे काढले जातील. त्यानिमित्ताने गेले दोन महिने दिल्लीच्या वेशींवर आंदोलन करणारे शेतकरी दिल्लीत प्रवेश करतील, अशी माहिती स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली आहे.

  

दिल्लीच्या सीमेवर तणाव...

दिल्लीच्या सीमेवर तणाव…राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे. मात्र त्याआधी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले आहेत.

पोलिसांकडून ड्रोनचा वापर

फरिदाबाद – पालवाल बॉर्डरवर सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला असून सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.

गाझीपूर बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले असून तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या दिशेने अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या आहेत. 

गाझीपूर बॉर्डरवर संघर्ष;दिल्ली पोलीस म्हणतात….

दिल्ली पोलिसांनी आपण उत्तर प्रदेश पोलीस आणि काही शेतकरी नेत्यांच्या संपर्कात असल्याचं गाझीपूर बॉर्डरवर तैनात पूर्व दिल्लीच्या डीसीपींनी माहिती दिली आहे. तसेच ड्रोनच्या माध्यमातून ट्रॅक्टर मोर्चावर नजर ठेवली जात असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे. 

दिल्ली-हरियाणाच्या तिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांची पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स तोडले आहेत. हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे आहेत.

 

Drone landed mood to ignite the peasant struggle Police to find the intruder

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती