चहा, कॉफी प्या बिस्कीट कपातून ; कोल्हापूरच्या तीन तरुणांचा उपक्रम


वृत्तसंस्था

कोल्हापूर : चहा आणि कॉफी पिण्यासाठी प्लॅस्टिक किंवा कागदी कपाचा सर्रास वापर केला जातो. पण, ते बिस्कीट कपातून देण्याची अभिनव योजना कोल्हापूरच्या तीन तरुणांनी साकार केली आहे. त्यामुळे प्लास्टिक, कागदापासून होणारे प्रदूषण कमी होण्यास हातभार लागला आहे. Drink tea, coffee from biscuit cuts; An initiative of three youths from Kolhapur

दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तरुणांनी ही कल्पना प्रत्यक्षात सत्यात उतरवली आहे. तिघेही अभियंता असून काही तरी वेगळे करण्याच्या हेतूने त्यांनी बिस्कीट कप तयार केले. या कपमधून चहा, कॉफी पिल्यावर तो कप खाता येतो. त्यामुळे प्लॅस्टिक, कागदी कपापासून होणारे प्रदूषण आणि कचरा रोखण्यास मदत मिळते.बिस्कीट कप मैद्यापासून तयार केले आहेत. त्यामुळे खाण्यास योग्य आहेत. मॅग्नेट एडिबल कटलरी या ब्रँड अंतर्गत हे बिस्कीट कप तयार केले आहेत. त्याशिवाय अशी आणखी काही उत्पादने बनविण्याची त्यांची योजना आहे.

Drink tea, coffee from biscuit cuts; An initiative of three youths from Kolhapur

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था