ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलल्याने जावेद अख्तर चिडले; “ते” मानवी अवयवांची नावेही बदलतील, असे म्हणाले!!


वृत्तसंस्था

मुंबई : ड्रॅगन फ्रूटचे नाव गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणींनी बदलले आणि बॉलिवूडचे डायलॉग लेखक जावेद अख्तर चिडले. हे भाजपवाले मानवी अवयवांची नावेही बदलतील, असे ते म्हणाले. देशात नामांतराच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. अलाहाबादचे प्रयागराज झाले आहे. Dragon Fruit looks like a lotus flower it shall be renamed to ‘Kamalam’ which is the Sanskrit word for it

औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव होते आहे. तसे विजय रूपाणींना ज्या फळाला चीनी नाव होते, ड्रॅगन फ्रूट…ते बदलून कमलम फ्रूट असे ठेवले. याचा जावेद अख्तर यांना राग आला. आधीच भरपूर नामांतरे होत असताना फळांचीही नावे बदलण्यावरून त्यांनी ट्विटरवरून निशाणा साधला.अख्तर यांनी ट्विट केले आहे, की ‘गुजरातचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले की ड्रॅगन फ्रूट हे कमळासारखे दिसते. त्यामुळे त्याचे नाव कमलम असे असायल हवे. शानदार. आधी शहरांची नावे आणि आता फळांची नावे बदललीत.

Dragon Fruit looks like a lotus flower it shall be renamed to ‘Kamalam’ which is the Sanskrit word for it

काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही ते बदलतील. त्यांनी सगळ्या गोष्टींची खिल्लीच उडवायचे ठरवलेय.’ अख्तर यांच्या ट्विटवर अनेकांनी अनुकूल – प्रतिकूल कमेंटही केल्या आहेत. त्या कमेंटमधून त्यांचे हे ट्विट चर्चेत आले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी