मलेशियाच्या माजी पंतप्रधानाचे फ्रान्सविरोधात विषारी फुत्कार, लाखो फ्रेंचांना मारण्याचा मुस्लिमांना अधिकार, महाथीर मोहम्मदचे ट्विट


  • फ्रान्समधील चर्चवरच्या हल्ल्याचे अतिहिंसक समर्थन

वृत्तसंस्था

कौलालंपूर : मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी फ्रान्सविरोधात विषारी फुत्कार टाकले आहेत. लाखो फ्रेंच लोकांना ठार करण्याचा मुस्लिमांना अधिकार आहे, असे चिथावणीखोर महाथीर मोहम्मद (dr mahathir mohamad ) यांनी केलं आहे. फ्रान्समध्ये एका हल्लेखोराने अल्ला हू अकबरचे नारे देत एका चर्चमध्ये हल्ला करून तीन फ्रेंच नागरिकांना ठार केले. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता.

या महिलेचा गळा चिरून त्याने तिची हत्या केली. या घटनेबाबत ट्विट करून महाथीर मोहम्मद यांनी वरील विषारी फुत्कार टाकले. आत्तापर्यंत झालेला रक्तपात पाहता लाखो फ्रेंच नागरिकांना ठार मारण्याचा आणि आपला राग व्यक्त करण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे, असे या ट्विटमध्ये महाथीर मोहम्मद यांनी म्हटले आहे.

फ्रान्सचा इतिहास पाहिला तर आजवर त्या देशानेही लाखो माणसं मारली त्यामध्ये अनेक मुस्लिम होते. फ्रान्सने घडवलेला रक्तपात पाहता मुस्लिम लोकांनी जर राग व्यक्त केला आणि माणसं मारली तर त्यांना त्याचा पूर्ण हक्क आहे, असेही महाथीर यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी फ्रेंच शिक्षकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर आजच फ्रान्समधल्या चर्चमध्ये हल्ला झाला. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला आहे. दरम्यान मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी मुस्लिमांना लाखो फ्रेंच नागरिकांना मारण्याचा अधिकार आहे असं धक्कादायक ट्विट या घटनेबाबत केलं आहे.

मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरुन सुरु झालेल्या वादातून फ्रान्सच्या चर्चमध्ये चाकू हल्ला झाला आहे. यामध्ये एका महिलेसह तिघांची हत्या करण्यात आली आहे. ज्या हल्लेखोराने हत्या केली त्याने आधी अल्ला हो अकबरचे नारे दिले. फ्रान्सच्या नीस शहरात असलेल्या चर्चमध्ये ही घटना घडली.

dr mahathir mohamad

पंतप्रधान मोदींनी नोंदवला तीव्र निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला. “आज नीसमधील चर्चमध्ये झालेल्या भयंकर हल्ल्यासह फ्रान्समध्ये अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा मी निषेध करतो. आमच्या सहवेदना हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या व फ्रान्समधील नागरिकांबरोबर आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत फ्रान्ससोबत उभा आहे आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

इतिहास शिक्षकाचा शिरच्छेद

काही दिवसांपूर्वीच प्रेषित महंमद पैगंबर यांची व्यंगचित्रं दाखवून त्याविषयावर चर्चा घडविल्यामुळे पॅरिसमध्ये एका इतिहासाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. ज्याने ही हत्या केली, तो १८ वर्षीय चेनेन नावाचा संशयित आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला होता.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती