मतदान ओळखपत्रे करा डाऊनलोड, ई-ईपिकचे आजपासून वाटप; राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपक्रम


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सोमवारपासून (ता.२५ ) भारत निवडणूक आयोग ई-मतदार ओळखपत्राचे (ई-ईपिक) वाटप सुरू करणार आहे. मोबाइल अथवा कम्प्युटरवर डाउनलोड करता येणार आहेत.
राष्ट्रीय मतदार दिनाचा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली. Download voting cards, distribute e-epic from today

ई-मतदार ओळखपत्राचे (ई-ईपिक) मोबाइल अथवा कम्प्युटरवर डाउनलोड करता येणार आहे. निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली होती.निवडणूक आयोग २०११पासून दर वर्षी २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतो. राष्ट्रीय मतदार दिनाचा देशपातळीवरील मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीत, तर राज्यस्तरावरचा कार्यक्रम मुंबईत होत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान असतील. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर प्रमुख पाहुणे आहेत.

Download voting cards, distribute e-epic from today

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती