वाहनांवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल; महामार्ग, द्रुतगतीवर 15 फेब्रुवारीनंतर अंमलबजावणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व वाहनावर फास्टॅग लावणे बंधनकारक केले आहे. अन्यथा टोल नाक्यावरून जाताना तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याची काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.Double toll if there is no fastag on vehicles

फास्टॅग हे एक स्टीकर असून ते वाहनांच्या पुढील काचेवर लावावे लागते. त्यानंतर वाहन टोल नाक्यावर आल्यावर टोलची रक्कम वाहनधारकाच्या खात्यातून फास्टॅगच्या स्टिकरच्या माध्यमातून तो स्कॅन झाल्यावर आपोआप वजा होते. त्यासाठी नाक्यावर थांबायची गरज नसते.महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर वाहने धावत असताना टोल नाक्यावर ती पूर्वी टोल देण्यासाठी थांबत असत. त्यामुळे जलद प्रवासात अडचण येत होती आणि वाहनांच्या रांगा लागत असल्याने वेळही जात होता. यातून सुटका करण्यासाठी फास्टॅगचा जन्म झाला. ते वाहनावर लावावे, यासाठी अनेकदा मुदतवाढ केंद्राने दिली होती.

1 जानेवारी 2021 पासून ते बंधनकारक केले आहे. त्यासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम तारीख दिली आहे. आता जेमतेम आठवडा उरला असल्याने वाहनावर फास्टॅगच्या स्टिकर बसवून घ्या आणि दुप्पट टोल देण्याच्या संकटातून सुटका करून घ्या.

Double toll if there is no fastag on vehicles

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*