जोडीदारासोबतच्या सेक्ससाठी किंमत लावू नका, कंगना रनौटने शशी थरुर, कमल हसन यांना सुनावले

जोडादारासोबतच्या सेक्ससाठी आता तुम्ही या कायद्याच्या माध्यमातून प्राइज टॅग लावू नका. महिलांना आपल्या छोट्या घररूपी साम्राज्याची मालकीण बनण्यासाठी पगाराची गरज नाही, अशा शब्दांत प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने कॉंग्रेसचे नेते शशी थरुर आणि अभिनेता कमल हसन यांना सुनावले आहे. Dont price sex with your partner, Kangana Ranaut tells Shashi Tharoor, Kamal Hassan


विशेष प्रतिनिधी

मुंबई : जोडादारासोबतच्या सेक्ससाठी आता तुम्ही या कायद्याच्या माध्यमातून प्राइज टॅग लावू नका. महिलांना आपल्या छोट्या घररूपी साम्राज्याची मालकीण बनण्यासाठी पगाराची गरज नाही, अशा शब्दांत प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने कॉंग्रेसचे नेते शशी थरुर आणि अभिनेता कमल हसन यांना सुनावले आहे.

मक्कल नीधी मैयम (एमएनएम) चे अध्यक्ष आणि अभिनेते कमल हासन यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अण्णा द्रमूक आणि द्रमूक या राजकीय पक्षांवर निशाणा साधला होता. त्यांनी तामिळनाडूतील महिलांच्या सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित केला होता. गृहिणी महिलांचे काम व्यवसाय समजण्यात यावे आणि त्यासाठी त्यांना वेतनही दिले जावे अशी भूमिका कमल हासन यांनी मांडली आहे.गृहिणी महिलांना पगार देण्याबद्दल अभिनेते कमल हासन यांनी मांडलेल्या मुद्याचे काँग्रेस नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरुर यांनी स्वागत केले आहे. यावरुन नाराजी व्यक्त करताना कंगनाने सोशल मीडियावर लिहिले की, आमच्या लैंगिकता किंमतीत मोजू नका. आम्हाला आमच्या लोकांची काळजी घेण्यासाठी पैसे देऊ नका. महिलांना आपल्या छोट्या घररूपी साम्राज्याची मालकीण बनण्यासाठी पगाराची गरज नाही. आम्हाला मातृत्वासाठी पैसे देऊ नका. प्रत्येक गोष्टीकडे व्यवसाय म्हणून बघणे बंद करा. आपल्या घरातील महिलांसमोर स्वत:ला समर्पित करा. त्यांना तुमची गरज आहे, फक्त तुमच्या प्रेमाची, सन्मानाची.. पगाराची नाही, असे म्हणत कंगनाने शशी थरूर यांना उत्तर दिले आहे.

Dont price sex with your partner, Kangana Ranaut tells Shashi Tharoor, Kamal Hassan

शशी थरुर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, गृहिणींना वेतन देण्याच्या कमल हासन यांच्या कल्पनेचे मी स्वागत करतो. राज्य सरकारने गृहिणींना मासिक वेतन देणे हे गृहिणींच्या कामाला समाजात ओळख निर्माण करून देईल. त्याचबरोबर त्यांना आर्थिक बळही देईल. गृहिणींची सेवा त्यांची शक्ती आणि स्वायतत्ता वाढवेल आणि सार्वत्रिकपणे मूलभूत वेतन तयार करेल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*