कोरोना लस देताना वशिलेबाजी नको; राजकारण्यांनाही प्राधान्य देऊ नका! मोदी यांचे आदेश


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : जगात सगळीकडे कोरोना लसीबाबत चर्चा सुरू झाली असताना भारतात लस देण्याची तयारी झाली आहे. मात्र, लसीकरण करताना कोण किती मोठा आहे हे पाहू नका. संपूर्ण नियमांचे पालन करा. अगदी राजकारण्यांनाही प्राधान्य देऊ नका. त्यांनाही नियमानुसारच लस द्या असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. Don’t even give priority to politicians! Modi’s orders

कोरोना लसीकरणाला सुरूवात होण्याच्या पार्श्वभूमीवर यामध्ये कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी चालणार नाही, असे स्पष्ट आदेश पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत दिले आहेत.
कोरोना लसीकरणासाठी सरकारने प्राधान्य यादी बनविली आहे. त्यांनाच पहिल्या टप्यता लस दिली जाणार आहे. यामध्ये देशातील एक कोटींहून अधिक आरोग्य कर्मचाºयांचा समावेश आहे.त्यानंतर दोन कोटी फ्रंटलाईन वर्करना लस दिली जाणार आहे. त्यापाठोपाठ पन्नास वर्षांवरील वय आणि डायबेटिस, रक्तदाब यासारखे विकार असणाºयांना लसकीरण होणार आहे. त्याची सुरूवात १६ जानेवारी रोजी होणार आहे. या पहिल्या टप्यात ३० कोटी लोकांना लसीकरण होईल, असा आंदाज आहे.

हरियाणा सरकारने खासदार, आमदारांचा समावेश असलेली लोकप्रतिनिधींची यादी लसीकरणासाठी तयार केली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणात कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे.

Don’t even give priority to politicians! Modi’s orders

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बिहार आणि ओडिशाच्या आरोग्य मंत्र्यांनी लोकप्रतिनिधींचा समावेश फ्रंटलाईन वर्कर्समध्ये करावा. ग्राम पंचायत पासून ते संसदेपर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींना लसीकरणात प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले होते की पहिल्या टप्यात सर्वांनाच लसीकरण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ज्यांना सर्वाधिक गरज आहे, त्यांनाच लस दिली जाईल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था