विश्व सिंधी समाजाकडून राम मंदिरासाठी 200 किलो चांदीच्या विटा दान डोक्यावर आणले विटांचे खोके


विशेष प्रतिनिधी

अयोध्या: अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यासाठी विश्व सिंधी समाजाने दोनशे किलो चांदीचे दान दिले आहे. ही चांदी प्रत्येकी एक किलोग्रॅम वजनाच्या विटांच्या आकारात आहे. सिंधी समाजातील लोक डोक्यावर चांदीच्या विटांनी भरलेला बॉक्स घेऊन दान देण्यासाठी पोहोचले. त्यांनी जय श्री राम चा जयघोष करत ह्या विटा रामप्रभूंना अर्पण केल्या. Donation of 200 kg silver bricks for Ram Mandir from Vishwa Sindhi Samaj

विश्व सिंधी समाज संघटनेचे प्रमुख राजू मानवाणी म्हणाले की, त्यांची संघटना केवळ भारताचेच नाही तर परदेशातही सिंधी समाजाचे प्रतिनिधित्व करते. या चांदीच्या विटा अर्पण करण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात नेपाळ व अन्य तीन देशांव्यतिरिक्त भारतातील विविध भागातील सिंधी समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश होता.प्रतिनिधी मंडळात सामील झालेले दिल्ली भाजपचे माजी आमदार विजय जॉली म्हणाले की, ते कार सेवेदरम्यान लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह 1992 मध्ये अयोध्येत आले होते. त्यावेळी ते भाजपा युवा मोर्चाचे अधिकारी होते.

मी 28 वर्षानंतर इथे आलो आहे. मला त्या काळातला संपूर्ण संघर्ष पुन्हा आठवला .प्रभू श्री रामांचा आदर करणारे लोक इतर समाजातही आहेत असे ते म्हणाले.

राजू मानवाणी म्हणाले की, राम मंदिर बांधण्यासाठी 200 किलोग्राम चांदी जगभरातील सिंधी समाजाने अर्पण केली आहे. या विटा घेऊन आलेल्या शिष्टमंडळाचे भारत आणि इतर देशांतील विविध क्षेत्रांचे प्रतिनिधी देखील आहेत. 500 वर्षांनंतर रामलल्लासाठी मंदिर बांधले जात आहे. प्रत्येकजण या आनंदात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे.

Donation of 200 kg silver bricks for Ram Mandir from Vishwa Sindhi Samaj

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था