ट्रम्प समर्थकांचा अमेरिकेतला धुडगूस, तोडफोड खेदजनक; सत्तांतर शांततेच व्हावे; मोदींनी व्यक्त केली अपेक्षा; ट्रम्प यांचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्सचेही ट्रम्पविरोधात वक्तव्य

अमेरिकन कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसक संघर्षाचा जगभरातील लोकशाही राष्ट्रांमधून निषेध होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावर नाराजी व्यक्त केली असून त्या देशातील सत्तांतर शांततेच पार पडले पाहिजे. हिंसक जमावाचा लोकशाही व्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. Donald Trump supporters lash out at US, vandalism deplorable; Vice President Mike Pence’s anti-Trump statement


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकन कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसक संघर्षाचा जगभरातील लोकशाही राष्ट्रांमधून निषेध होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावर नाराजी व्यक्त केली असून त्या देशातील सत्तांतर शांततेच पार पडले पाहिजे. हिंसक जमावाचा लोकशाही व्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स आणि अमेरिकन काँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहाच्या सभापती नॅन्सी पॅलोसी हे दोन महत्त्वाचे नेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात गेले असून त्यांनी सत्तांतर शांततेत आणि राज्यघटनेतील प्रक्रियेनुसारच पार पाडण्याची व्यवस्थाही सुरू केली आहे. ट्रम्प प्रशासनातील अनेकजणांनी मुदत संपण्यापूर्वीच राजीनामे देऊन झाल्या प्रकाराबद्दल नाराजीही उघडपणे व्यक्त केली आहे.अमेरिकन काँग्रेस सायंकाळपर्यंत बायडेनच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार; ट्रम्प यांची सगळी सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड; मोदींचा शांततापूर्ण सत्तांतराला पाठिंबा
तत्पूर्वी, अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालानंतरही प्रचंड राजकीय तणावात ट्रम्प समर्थकांनी कॉपिटॉल हिलवर प्रचंड धुडगूस घालून तोडफोड केली. त्याचे जगभरात पडसाद उमटल्यानंतर ट्रम्प समर्थक विरूद्ध ट्रम्प विरोधक अशी उभी फूट नुसती अमेरिकेतच नव्हे, तर जगभर पडली. या सगळ्या गदारोळात ट्रम्प यांनी चिथावणीची भर टाकू नये यासाठी त्यांची फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया अकाउंट १२ तासांसाठी बंद करण्यात आली आहेत.

अमेरिकन काँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पॅलोसी आणि वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध नेते उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी थेट ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका जाहीर करून सत्तांतराचा मार्ग अमेरिकन राज्यघटनेनुसारच पार पाडला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

निवडणूक निकालात फेरफार झाल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Donald Trump supporters lash out at US, vandalism deplorable; Vice President Mike Pence’s anti-Trump statement

निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, परिणामी संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळही घातला. या घटनेवर देशभरातच नव्हे, तर जगभरातून टीका होत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*