डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणूक निकाल बदलण्यासाठी दबाव, फोन कॉल व्हायरल झाल्याने अमेरिकेत राजकीय भूकंप

अमेरिकेच्या जॉर्जियातील आपल्या पराभवाचे रूपांतर विजयात करण्यासाठी ट्रम्प यांनी निवडणूक अधिकाऱ्यास पुरेशी मते शोधण्यास सांगितले. या फोन कॉलचा ऑडिओ अमेरिकन माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर मोठे राजकीय वादळ आले आहे. Donald Trump pressure to change election results, phone call goes viral


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणीदरम्यान पराभव होत असल्याचे पाहून जॉर्जियाच्या सर्वोच्च निवडणुकीच्या अधिकाऱ्यांना निकालात ‘बदल’ करण्यास सांगून दबाव आणला होता. अमेरिकेच्या जॉर्जियातील आपल्या पराभवाचे रूपांतर विजयात करण्यासाठी ट्रम्प यांनी निवडणूक अधिकाऱ्यास पुरेशी मते शोधण्यास सांगितले. या फोन कॉलचा ऑडिओ अमेरिकन माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर मोठे राजकीय वादळ आले आहे.

निवडणुकीत झालेल्या पराभवापासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने दावा करत आहेत की, जो बिडेन यांच्या हातून त्यांचा पराभव मोठ्या प्रमाणात मतांच्या गडबडीमुळे झाला आहे. ट्रम्प यांचा हा दावा राज्य आणि फेडरल निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि अनेक कोर्टांनी फेटाळलेला आहे. ट्रम्प यांनी हा फोन जॉर्जियाचे राज्य सचिव आणि रिपब्लिकन नेते ब्रॅड रफनस्पर्गर यांना अशा वेळी केला होता, जेव्हा अमेरिकन कॉंग्रेसमधील त्यांच्या काही मित्रपक्षांनी बिडेन यांच्या विजयाच्या औपचारिक दाखल्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला होता.‘मला फक्त 11,780 मते हवी आहेत’
व्हायरल संभाषणात ट्रम्प वारंवार रफनस्पर्गरवर बिडेनऐवजी स्वत:ला विजेते म्हणून घोषित करण्यासाठी दबाव आणत आहेत. ट्रम्प म्हणाले, ‘तुम्ही फक्त ते करावे अशी माझी इच्छा आहे. मला फक्त 11,780 मते मिळवायची आहेत, जी आपल्याकडे असलेल्या मतांपेक्षा अधिक आहेत.’

ट्रम्प म्हणाले, “तुम्हाला हे माहितीये की, जर तुम्ही मतांची पुन्हा मोजणी केली असे म्हणालात तर ते चूक ठरणार नाही.” जॉर्जियामध्ये बॅलेटची तीन वेळा मोजणी झाली, परिणामी बायडेन यांच्या विजयाचे दोन निकाल आले. अंतिम निकालात जो बिडेन 11,779 मतांनी विजयी झाला. जॉर्जियामध्ये एकूण 50 लाख मते होती. रिपब्लिकन नेते ब्रॅड रफनस्पर्गर यांनी ट्रम्प यांचा हा दावा फेटाळला आणि म्हटले की, आपण सोशल मीडियावरील बनावट गोष्टींवर विसंबून आहात.

Donald Trump pressure to change election results, phone call goes viral

हे संभाषण व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झाले आहे. ट्रम्प आणि ब्रॅड रफन्सपर्गर यांच्या कार्यालयांनी या कॉलवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, बिडेन समर्थकांनी ट्रम्प यांच्या फोन कॉलला अमेरिकन लोकशाहीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*