मदत मागताच ७० हजार कोरोना लसीचे डोस, डॉमनिक रिपब्लिकच्या पंतप्रधानांनी भावुक होत मानले मोदींचे आभार

डॉमनिक रिपब्लिकच्या मागणीनुसार भारताने कोरोना लसीचे ७० हजार डोस पाठवले. भारताकडून एवढ्या तात्काळ मदत मिळेल अशी अपेक्षा आम्हाला नव्हती असं सांगत भावूक झालेले पंतप्रधान रूझवेल्ट स्कैरिट यांनी सर्व भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. Dominican PM seeks 70,000 doses of corona vaccine


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : डॉमनिक रिपब्लिकच्या मागणीनुसार भारताने कोरोना लसीचे ७० हजार डोस पाठवले. भारताकडून एवढ्या तात्काळ मदत मिळेल अशी अपेक्षा आम्हाला नव्हती असं सांगत भावूक झालेले पंतप्रधान रूझवेल्ट स्कैरिट यांनी सर्व भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने देशामध्ये लसीकरणाला सुरुवात केली आहे. देशांतर्गत लसीकरणाला सुरुवात करतानाच भारताने जागतिक स्तरावर कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये योगदान देण्यास सुरूवात केली आहे. अनेक देशांना भारताने करोना लसींचे डोस मोफत देण्यास सुरुवात केली आहे.काही देशांनी भारताकडे मदतीचा हात मागितला आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये डॉमनिकन रिपब्लिकने भारताकडे मदत मागितली होती. डॉमनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान रूझवेल्ट स्कैरिट यांनी भारताने कोरोना लसीचे ७० हजार डोस मदत म्हणून पाठवावेत अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं होतं.

त्यानुसार अवघ्या दोन आठवड्यांमध्ये भारताने ही मागणी मान्य करत बुधवारी डॉमनिक रिपब्लिकला ७० हजार डोस पाठवले. भारताकडून एवढ्या तात्काळ मदत मिळेल अशी अपेक्षा आम्हाला नव्हती असं सांगत भावूक झालेल्या स्कैरिट यांनी सर्व भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

कोरोना लसींचे डोस घेऊन जाणारं विमान डॉमनिकन रिपब्लिक पोहचल्यानंतर देशाचे पंतप्रधान स्कैरिट यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. मी इतकचं म्हणेन की आमची मागणी एवढ्या तातडीने मान्य करुन मदत केली जाईल असे आम्हाला वाटले नव्हते. एवढं गंभीर संकट समोर असताना आपल्या देशाचं संरक्षण करणं किती आव्हानात्मक आहे हे कोणीही सांगू शकतो. असं असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताने मदतीचा हात पुढे केल्यानेच आम्हाला ही लस मिळाली. आम्हाला प्राधान्य देत त्यांनी मदत केली. त्यांनी आमच्यासारख्या लहान देशातील लोकांचाही लसीवर तितकाच अधिकार असल्याचे कृती मधून दाखवून देत आमचा समानतेच्या हक्कावर शिक्कामोर्तब केलं. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.

ट्विटरवरुनही त्यांनी भारताचे आभार मानले आहेत. बायबलमधील प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे. पण मी हे नक्कीच मान्य केले पाहिजे की माझ्या देशाची प्रार्थनांना एवढ्या लवकर आणि तातडीने उत्तर मिळेल असं वाटलं नव्हतं. धन्यवाद भारत. अन्य एका ट्विटमधून त्यांनी तातडीने देशामध्ये करोना लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. स्कैरिट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रामध्ये मदतीचं आवाहन करत भावनिक साद घातली होती. जगाने २०२१ मध्ये प्रवेश केल्यानंतरही आपल्या सर्वांची कोविड-१९ विरोधातील लढाई सुरु आहे. डॉमनिकमधील ७२ हजार लोकसंख्येला ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लसीची खूप गरज आहे. यासाठी मी तुमच्याकडे विनंती करतो की आमच्या देशातील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या गरजेनुसार कोरोना लसीचे डोस मदत म्हणून पाठवून आम्हाला सहकार्य करावे.

सध्या कोरोनाची लस मिळवण्याची जागतिक स्तरावर जी स्पर्धा सुरु आहे त्याच पार्श्वभूमीवर मी तुम्हाला आमच्या देशातील जनतेसमोरील समस्यांबद्दल सांगू इच्छितो. निर्माण करण्यात येणाऱ्या कोरोना लसींपैकी अर्ध्या लसी देशातील विकसनशील देशांना देण्याचा शब्द ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनने दिला असला तरी आमच्या देशातील लोकांना ही लस एवढ्या मिळणार नाही असं चित्र दिसत आहे. आमचा देश हा एक छोटेसे बेट असून तो विकसनशील देशांपैकी एक आहे. कोरोना लसींसाठी सध्या जगभरामध्ये स्पर्धा सुरु असून या मोठ्या देशांच्या कोरोना लस मिळवण्याच्या स्पर्धेत आम्ही टिकणार नाही. त्यामुळेच भारताने आम्हाला मदत करावी.

Dominican PM seeks 70,000 doses of corona vaccine

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*