सरकारमधील मंत्र्यांकडूनच समाजामध्ये भांडणे, मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, विनायक मेटे यांची टीका

सरकारमधील काही मंत्री समाजा-समाजात भांडणं कशी लागतील हे पाहत आहेत. अशा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी विशेष समज द्यावी. जर सरकारमध्ये राहायचं असेल तर सामाजिक ऐक्य जोपासावे. दोन समाजात वाद होतील अशी वक्तव्य करायची असतील तर सरळ मंत्रीमंडळातून बाहेर पडावे, असं मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना सांगायला पाहिजे, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सरकारमधील काही मंत्री समाजा-समाजात भांडणं कशी लागतील हे पाहत आहेत. अशा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी विशेष समज द्यावी. जर सरकारमध्ये राहायचं असेल तर सामाजिक ऐक्य जोपासावे. दोन समाजामध्ये वाद होतील अशी वक्तव्य करायची असतील तर सरळ मंत्रीमंडळातून बाहेर पडावे, असं मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना सांगायला पाहिजे, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. Disputes in the society by the ministers in the government Vinayak Mete criticism

उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीय. त्यांच्या कर्तृत्वामुळे मराठा समाजावर ही वेळ आली आहे. आरक्षण टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर अवलंबून राहू नये, अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. मेटे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही याबाबत समाजात मोठी अस्वस्थता आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर अवलंबून राहू नये. मराठा आरक्षणाच्या संबंधित सर्व संघटना आणि नेत्यांची बैठक बोलावण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनीही ही विनंती मान्य केली आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत बैठक बोलावली जाईल.उपसमितीने आणि सरकारने आरक्षण टिकवण्यासाठी नेमकी काय रणनिती आहे, हे समाजाला सांगावे. मराठा आरक्षणाला होत असलेला विलंब आणि समाजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने यापुढची पावले टाकावीत. सरकारमधील मंत्रीच जातीयवादी भूमिका घेत आहेत. जे नेते मंत्री उठता बसता फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात त्यांच्याकडूनच जातीयवादी भूमिका घेतली जाते, असा आरोप करून मेटे म्हणाले, सरकारमधील काही मंत्री समाजा-समाजामध्ये भांडणं कशी लागतील हे पाहत आहेत. अशा मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी विशेष समज द्यावी.

Disputes in the society by the ministers in the government Vinayak Mete criticism

औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची चांगली संधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात आलेली आहे. त्यांनी ती दवडता कामा नये. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या काळात खूप प्रयत्न केले होते. जर यामध्ये काही अडचणी असतील तर त्या मुख्यमंत्र्यांनी दूर कराव्यात. त्यांच्या सरकार मधील काही पक्षांनी त्यांची मतं अबाधित ठेवण्यासाठी जरी विरोध केला तरी त्यांनी त्यांच्या विरोधाकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन मेटे यांनी केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*