युरोपाच्या तुलनेत भारतीय यूजर्सबाबत भेदभाव, केंद्र सरकारने व्हॉटसअ‍ॅपला फटकारले


युरोपातील युजर्सच्या तुलनेत व्हॉट्सअ‍ॅप भारतीय युजर्ससोबत भेदभाव करत आहे. दोन्ही युजर्सशी वेगवेगळा व्यवहार केला जातोय. सरकारसाठी हा चिंतेचा विषय असल्याने सरकार याकडे पूर्ण लक्ष देत आहे, अशा शब्दांत केंद्र सरकारने व्हॉटसअ‍ॅपला फटकारले आहे. Discrimination against Indian users compared to Europe


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : युरोपातील युजर्सच्या तुलनेत व्हॉट्सअ‍ॅप भारतीय युजर्ससोबत भेदभाव करत आहे. दोन्ही युजर्सशी वेगवेगळा व्यवहार केला जातोय. सरकारसाठी हा चिंतेचा विषय असल्याने सरकार याकडे पूर्ण लक्ष देत आहे, अशा शब्दांत केंद्र सरकारने व्हॉटसअ‍ॅपला फटकारले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने आणलेल्या नवीन धोरणाचा सामान्यांनी धसका घेतला आहे. मित्र आणि कुटुंबीयांसह वापरकर्त्यांच्या (युजर्सच्या) संदेशांच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरु आहे.सोमवारी (25 जानेवारी) या सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टात केंद्र सरकराने म्हटले की, प्रायव्हसी पॉलिसीच्या बाबतीत व्हॉट्सअ‍ॅप भारतीय युजर्ससोबत भेदभाव करत आहे. केंद्र सरकारने आरोप केला आहे की, युरोपातील युजर्सच्या तुलनेत व्हॉट्सअ‍ॅप भारतीय युजर्ससोबत भेदभाव करत आहे. दोन्ही युजर्सशी वेगवेगळा व्यवहार केला जातोय. सरकारसाठी हा चिंतेचा विषय असल्याने सरकार याकडे पूर्ण लक्ष देत आहे.

फेसबुकच्या मालकीचा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म व्हॉट्स अँपच्या नवीन गोपनीयता धोरणाविरूद्ध एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्यासमोर सरकारची बाजू मांडली. या सुनावणीदरम्यान शर्मा यांनी कोटार्ला सांगितले की भारतीय वापरकर्त्यांचा डेटा फेसबुकसह अन्य कंपन्यांसोबत शेअर केला जाणार आहे. परंतु ही पॉलिसी नाकारण्याचा पर्याय दिलेला नाही.

व्हॉट्सअ‍ॅपकडून कोर्टात आलेले ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, कंपनीला सरकारचे पत्र मिळाले आहे. आम्ही लवकरच याबाबत माहिती देऊ. आता या प्रकरणाची सुनावणी 1 मार्चला होणार आहे.

Discrimination against Indian users compared to Europe

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था