Discovery of uranium from India in Arunachal Pradesh has made China irritate

अरुणाचल प्रदेशात भारताकडून युरेनियमच्या शोधामुळे चीनचा झाला तिळपापड, काल्पनिक दावे करत पुन्हा चिनी वल्गना

अरुणाचल प्रदेशात चीनच्या सीमेजवळ भारताला युरेनियमचा शोध लागला आहे. या वृत्तामुळे ग्लोबल टाइम्स या चीन सरकारच्या मुखपत्र म्हटले की, भारताचे हे वर्तन एलएसीवरील चर्चेला हानिकारक आहे. एवढेच नाही, तर ग्लोबल टाइम्सने या शोधाचे कौतुक केल्याबद्दल भारतीय माध्यमांवरही टीका केली आहे. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेशावर दावा सांगत आला आहे. म्हणूनच आता युरेनियमच्या शोधामुळे चीनचा तिळपापड झाला आहे. Discovery of uranium from India in Arunachal Pradesh has made China irritate


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात चीनच्या सीमेजवळ भारताला युरेनियमचा शोध लागला आहे. या वृत्तामुळे ग्लोबल टाइम्स या चीन सरकारच्या मुखपत्र म्हटले की, भारताचे हे वर्तन एलएसीवरील चर्चेला हानिकारक आहे. एवढेच नाही, तर ग्लोबल टाइम्सने या शोधाचे कौतुक केल्याबद्दल भारतीय माध्यमांवरही टीका केली आहे. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेशावर दावा सांगत आला आहे. म्हणूनच आता युरेनियमच्या शोधामुळे चीनचा तिळपापड झाला आहे.

चिनी वृत्तपत्राने टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीचा हवाला देऊन म्हटले की, अरुणाचल प्रदेशात भारताच्या वतीने युरेनियमचा शोध घेण्यात येत आहे. या बातमीत भारताचे अटॉमिक मिनिरल्स डायरेक्ट्रेट डीके सिन्हा यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या भागात युरेनियमची असण्याचे संकेत मिळाले आहेत, यामुळे येथे शोध घेतला जातोय.मुजोर चीनचा कल्पनाविलास

ग्लोबल टाइम्सच्या बातमीत म्हटलंय की, चीनने या भागाला ‘अरुणाचल प्रदेश’ म्हणून कधीच मान्यता दिली नाही. भारत अरुणाचल प्रदेशावर दावा करतो तर चीन तिबेटचा दक्षिण भाग म्हणून याकडे पाहतो. चिनी वृत्तपत्राने हास्यास्पद दावा केलाय की, मागच्या शतकात ‘अरुणाचल प्रदेश’ची निर्मिती झाली. या निर्मितीत चीनचा 90 हजार चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे.

चीनकडून कारवाईची मागणी

‘ग्लोबल टाइम्स’ने तोहुआ विद्यापीठातील ‘इंडियन स्टडीज’चे सहायक प्राध्यापक जी चाओ यांच्या हवाल्याने म्हटले की, भारताच्या या भागातील युरेनियमच्या अस्तित्वाच्या दाव्यापेक्षा या भागावर दावा करणे जास्त चुकीचे आहे. एवढेच नाही, तर या चाओ महाशयांनी चीनला भारतावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चिनी वृत्तपत्राचा असा विश्वास आहे की, अरुणाचल प्रदेशात युरेनियम अस्तित्वाच्या भारतीय दाव्यामुळे दोन्ही देशांमधील सीमेविषयक चर्चेचे नुकसान होईल. चिनी दैनिकाने ही ‘एकांगी’ एकतर्फी कारवाई असल्याचे म्हटले आहे. चीनने कितीही कोल्हेकुई केली तरी भारत अरुणाचल प्रदेशाला आपला अविभाज्य भाग मानत आलेला आहे. भारताने यावरून चीनला अनेकदा ठणकावलेदेखील आहे.

Discovery of uranium from India in Arunachal Pradesh has made China irritate

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*