दिग्विजय सिंह यांचा खोटेपणा उघड, बलात्कारीत पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी नोटीस

कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा खोटेपणा उघड झाला आहे. हाथरस येथील घटनेवर त्यांनी पीडितेचा फोटो ट्विट केला होता. या पीडितेची जीभ कापली होती असे त्यांनी म्हटले होते. मात्र, पोलीसांच्या तपासात हे खोटे असल्याचे उघड झाले. बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा खोटेपणा उघड झाला आहे. हाथरस येथील घटनेवर त्यांनी पीडितेचा फोटो ट्विट केला होता. या पीडितेची जीभ कापली होती असे त्यांनी म्हटले होते. मात्र, पोलीसांच्या तपासात हे खोटे असल्याचे उघड झाले. बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.

हाथरस घटनेनंतर दिग्विजय सिंह यांनी जबान एक बेटी की कटी, गुंगा पुरा देश हो गया, असे म्हणत बलात्कार पीडितेचा फोटो शेअर केला होता. त्यांनी चुकीची माहिती पसरवली. त्यांच्या या आरोपाला पोलीसांनी आणि वैद्यकीय तपासणीतही फेटाळून लावण्यात आले आहे. त्यानंतर दिग्विजय सिंह यांनी हे ट्विट डिलीट केले.

अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्यावरही राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. दिल्ली येथील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाचा फोटो शेअर करताना स्वरा भास्करने एक ट्विट केल होते. यामध्ये हाथरस पीडितेचा फोटो असलेले बॅनर होते. स्वरानेही आपले ट्विट डिलीट केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनाही नोटीस बजावली आहे. मालवीय यांनी एका ट्विटमध्ये हाथरस पीडितेचा व्हिडीओ शेअर केला होता. कथित हल्यानंतर पीडिता जमीनीवर पडली आहे आणि आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती देत आहे.

पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी तिघांनाही नोटीस पाठवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या संदर्भातील सूचनांचे उल्लंघन असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटले आहे की, हाथरस प्रकरणात बलात्काराचा मुद्दा स्पष्ट झाल्यावर आणखी काहींना नोटीसा देण्यात येतील. ज्या लोकांनी सोशल मीडिया किंवा आंदोलनामध्ये हाथरस पीडिताचे फोटो दाखविले आहेत, त्यांची पूर्ण माहिती आयोगाकडे आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*