दिग्गी राजा बोलले; भाजप – ओवैसी “मैत्रीवर” घसरले

  • भाजपाच्या सांगण्यावरून ओवैसी बिहारची निवडणूक लढवत आहेत; दिग्विजय सिंग यांचा “जावईशोध”  
  • बिहार विधानसभा निवडणूक २०२०

वृत्तसंस्था 

पाटण : बिहार विधानसभा निवडणुकीत हळूहळू रंगदार होताना दिसत असून, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरूवात झाली आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्त्वाखालील एआयएमआयएमने निवडणुकीत भाजपाच्या सांगण्यावरून उडी घेतली आहे, असा “जावईशोध” काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी लावला आहे.

बिहार विधानसभा निवडणूक एमआयएम बहुजन समाज पक्षासोबत आघाडी करून निवडणूक लढवणार आहेत. एमआयएमच्या बिहार निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे.

“ओवैसी हे भाजपाच्या सांगण्यावरून राजद-काँग्रेस महाआघाडीला नुकसान पोहोचवण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. पुन्हा एकदा माझे म्हणणे खरे ठरले आहे. भाजपा आणि ओवैसी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,” अशी टीका दिग्विजय सिंह यांनी ट्विटवरून केली आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी अधिकृतरित्या बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी हे ट्विट केलं आहे. एमआयएम यावेळी आरएलएसपी आणि बसपा यांच्यासोबत आघाडी करून निवडणूक लढवणार आहेत. अजून या आघाडीचे जागावाटप झाले नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनाही निवडणूक लढवणार आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*