आंदोलनावरून शेतकरी नेत्यांमध्ये मतभेद उघड, राकेश टिकैत यांच्या अट्टहासाला गुरनाम यांचा विरोध!

Differences between Farmer Leaders on Protest Reveled, Rakesh tikait Opposed By Gurnam

शेतकरी आंदोलन किती दिवस चालवायचे, ते दोन ऑक्टोबरपर्यंत ताणायचे की नाही, या मुद्द्यावरून शेतकरी नेत्यांमधील मतभेद स्पष्ट झाले आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले होते की, वर्षभर हे आंदोलन सुरू राहील. तर हरियाणामधील भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनामसिंग चाधुनी यांनी टिकैत यांचे हे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, राकेश टिकैत यांनी 2 ऑक्टोबरपर्यंत आंदोलन चालवण्याचे सांगितले होते. पण हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याचवेळी, चाधुनी यांनी निवडणुकीत भाजपला विरोध करण्यावर भर दिला आहे. Differences between Farmer Leaders on Protest Reveled, Rakesh tikait Opposed By Gurnam


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन किती दिवस चालवायचे, ते दोन ऑक्टोबरपर्यंत ताणायचे की नाही, या मुद्द्यावरून शेतकरी नेत्यांमधील मतभेद स्पष्ट झाले आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले होते की, वर्षभर हे आंदोलन सुरू राहील. तर हरियाणामधील भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनामसिंग चाधुनी यांनी टिकैत यांचे हे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, राकेश टिकैत यांनी 2 ऑक्टोबरपर्यंत आंदोलन चालवण्याचे सांगितले होते. पण हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याचवेळी, चाधुनी यांनी निवडणुकीत भाजपला विरोध करण्यावर भर दिला आहे.

हरियाणा किसान युनियनचे अध्यक्ष गुरनामसिंग चाधुनी यांनी चंदिगडमधील संयुक्त किसान मोर्चाच्या किसान महापंचायतीत सांगितले की, राकेश टिकैत यांनी 2 ऑक्टोबरपर्यंत आंदोलन करण्यासाठी जे म्हटले आहे ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. 2 ऑक्टोबरपर्यंतच्या त्यांच्या आंदोलनाविषयी आणि त्यानंतरच्या कार्यक्रमाबाबत संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या निवेदनावर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. हे त्यांचे वैयक्तिक मत आणि अजेंडा आहे.चाधुनी म्हणाले की, पालिका निवडणुकांमध्ये पंजाबमधील शेतकरी संघटनांकडून भाजपला पूर्ण विरोध झाला आहे आणि आता शेतकरी संघटनांनी निर्णय घेतला आहे की, भविष्यात जिथे निवडणुका होतील तेथे भारतीय जनता पक्षाला विरोध केला जाईल. येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार असून शेतकरी संघटनांनी तेथेही भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबतच दक्षिणेकडील राज्यांतही शेतकरी आंदोलन पसरवण्याची तयारी सुरू केली आहे.

तत्पूर्वी, चाधुनी म्हणाले की, हरियाणामध्ये महापंचायतींची गरज नव्हती. त्यांनी खाप व शेतकर्‍यांना कोणतीही पंचायत करू नये, असे सांगितले. चाधुनी म्हणाले की, पंजाब-हरियाणा येथील शेतकऱ्यांना कृषी कायद्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची कल्पना आहे. या दोन राज्यांत शेतकरी नेत्यांची महापंचायत आयोजित करून वेळ वाया घालवू नये, यामुळे इतर राज्यांपर्यंत पोहोचता येत नाही.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये किसान महापंचायतीला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. यावर राकेश टिकैत यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली.

Differences between Farmer Leaders on Protest Reveled, Rakesh tikait Opposed By Gurnam

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी