पेट्रोल, डिझेल पाच रुपयांनी स्वस्त; आसाम सरकारचा निर्णय: जनतेला दिलासा

वृत्तसंस्था

दिसपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती लिटरमागे पाच रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. त्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करणारे आसाम हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. Diesel petrol  decrease 5 rupees in asam

मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार 2016 पासून सत्तेवर आहे. या सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनहिताची अनेक कामे केली आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनाही प्रभावीपणे राबविल्या आहेत. उज्वला योजना, निराधाराना घरे, शेतकऱ्यांना मलमत्ता कार्ड आदी योजनांमुळे हे सरकार लोकप्रिय ठरले आहे.आता सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करून आणखी एक सुखद धक्का जनतेला दिला आहे. देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यावेळी सरकारने महसूल वाढविण्यासाठी मद्यावर 25 टक्के अतिरिक्त कर लावला होता. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कराची जादा रक्कम जमा झाली. त्यानंतर आता उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर मद्यावर लावलेला अतिरिक्त 25 टक्के कर मागे घेण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही निर्णयामुळे सरकार जनतेचे आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे.

आसाम निर्णय इतर राज्यांसाठी प्रेरक

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात असो किंवा मद्या लवरील कर मागे घेण्याचा आसाम सरकारचा निर्णय इतर राज्यांना प्रेरक ठरले आहेत.
एरवी भरमसाठ कर जनतेवर लावले जातात. मात्र, ते कधीही मागे घेतले जात नाहीत. पण, त्याला आसाम सरकार अपवाद ठरले आहे. सरकार केवळ पोपटपंची करणारे नको तर ते कृतिशील असावे, याचा आदर्श आसाम सरकारने इतर राज्य सरकारांपुढे घालून दिला आहे.

Diesel petrol  decrease 5 rupees in asam

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*