Dictator Kim Jong Un's sister Kim Yo Jong warns US President Joe Biden

हुकूमशहा किम जोंगच्या बहिणीचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इशारा, म्हणाल्या- अशी आगळीक करू नका की रात्रीची झोपही लागणार नाही!

अमेरिका ही जगातील सर्वात मोठी महासत्ता आहे, परंतु उत्तर कोरियासारखे काही देशांनी त्यांच्या नाकी नऊ आणलेले आहेत. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन नंतर त्यांची बहीण किम यो जोंग यांनीही अमेरिकेला धमकी दिली आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना इशारा देत त्यांनी म्हटले की, अशी कामे करण्याचे धाडस करू नका ज्यामुळे तुम्हाला रात्रीची झोपही लागणार नाही. Dictator Kim Jong Un’s sister Kim Yo Jong warns US President Joe Biden


विशेष प्रतिनिधी

सेऊल : अमेरिका ही जगातील सर्वात मोठी महासत्ता आहे, परंतु उत्तर कोरियासारखे काही देशांनी त्यांच्या नाकी नऊ आणलेले आहेत. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन नंतर त्यांची बहीण किम यो जोंग यांनीही अमेरिकेला धमकी दिली आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना इशारा देत त्यांनी म्हटले की, अशी कामे करण्याचे धाडस करू नका ज्यामुळे तुम्हाला रात्रीची झोपही लागणार नाही.अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन आणि परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांच्या सोमवारी जपान आणि दक्षिण कोरिया दौर्‍यावेळी उत्तर कोरियाने ही धमकी दिली आहे. अण्वस्त्रधारी उत्तर कोरिया, चीन यासारख्या देशांविरुद्ध अमेरिका आपल्या मित्र देशांच्या युतीला बळकट करत आहे. किम यो जोंग या त्यांच्या हुकूमशहा असलेल्या भावाच्या मुख्य सल्लागार आहेत. बायडेन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर 4 महिन्यांनी उत्तर कोरियाने आक्रमकता दाखविली आहे.

किम यो जोंग म्हणाल्या की, कदाचित अमेरिकेला आमच्या भागातील तोफांचा गंध जाणवत नाहीये. यापूर्वी, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग-उन यांना अण्वस्त्रांचे निशस्त्रीकरणाच्या मार्गावर नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. ट्रम्प राजवटीच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही देशांमधील संघर्ष गंभीर पातळीवर पोहोचले होते. उत्तर कोरियावर अनेक जागतिक आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत, ज्यामुळे ते हुकूमशहा किम जोंगने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Dictator Kim Jong Un’s sister Kim Yo Jong warns US President Joe Biden

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*