कमळावर निवडून आलेल्या परळीतल्या तीन पंचायत सदस्यांना धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत घेतले, दुसऱ्याच दिवशी ते तोंडघशी पडले!!

विशेष प्रतिनिधी

परळी : कमळ चिन्हावर निवडून आलेल्या परळीतल्या तीन पंचायत सदस्यांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले, पण दुसऱ्याच दिवशी ते तोंडघशी पडले!! कारण हे तीनही सदस्य पंकजा मुंडेंची भेट घेऊन भाजपशी निष्ठा व्यक्त करीत मोकळे झाले. Dhananjay Munde took three elected Panchayat members from Parli to NCP

कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादीत गेल्याने त्यांना राजीनामा देऊन परत निवडणूक लढवावी लागली असती. त्यातूनच राष्ट्रवादीने भाजप सदस्यांच्या प्रवेशाची केलेली बनवाबनवी कालच उघड झाली होती. दिव्य मराठीने ही बातमी दिली आहे.


शिवसेनेला राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा धक्का, सोलापुरातून महेश कोठेंना पळविले


राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीच्या स्वतःच्याच सभापतींवर अविश्वास ठराव आणला होता त्याची सुनावणी काल झाली. हा ठराव मंजूर व्हावा यासाठी त्यांनी बनाव रचून भाजपच्या तीन सदस्यांना पळवले होते. सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेस नोट काढून भाजपच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे माध्यमांना सांगितले.

वास्तविक ते तीनही सदस्य भाजपच्या अधिकृत चिन्हांवर निवडून आले असून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही, असे असतांना राष्ट्रवादीने माध्यमांची दिशाभूल करून त्यांच्या प्रवेशाच्या बातम्या दिल्या होत्या.

Dhananjay Munde took three elected Panchayat members from Parli to NCP

भाजपचे ते तीन सदस्य भरत सोनवणे, मुरलीधर साळवे व मोहन आचार्य यांनी आज दुपारी वैद्यनाथ साखर कारखान्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादीत प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले. या भेटीमुळे राष्ट्रवादीचा बनाव उघड झाला. अविश्वास व्यक्त झालेल्या सभापतींना देखील हे मान्य झाले नाही. त्यातून असून धनंजय मुंडे मात्र पंचायत समितीत तोंडघशी पडल्याचे स्पष्ट झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*