धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या ,भाजपचा मुख्यमंत्र्यांना इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणाबरोबर मुंडे यांनी आपण करुणा शर्मासोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं सांगितलं आहे.Dhananjay Munde should resign immediately, BJP

बलात्काराचे आरोप करणारी तरूणी ही करूणा शर्मा यांची बहीण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक झालं असून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्याना केली आहे.भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात खापरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. या घटनेमुळे समाजावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे वस्तुस्थितीचं गांभीर्य ओळखून मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असं खापरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

Dhananjay Munde should resign immediately, BJP

दरम्यान, मुंडेंचा राजीनामा घ्यावा नाहीतर आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन करू याची आपण नोंद घ्यावी, असं म्हणत खापरेंनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था