धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी


विशेष प्रतिनिधी’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील लैंगिक आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. Dhananjay Munde should resign from the ministry

त्यांनी आपल्या चुकीबद्दल राजीनामा द्यावा. भाजप महिला आघाडीच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात ही मागणी केली आहे. आम्हीही या प्रकरणी जोरदार मागणी करणार आहोत. ज्यावेळी अशा प्रकारे आरोप होतात तेव्हा त्याला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो.मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबीत आत्मपरीक्षण करून मुंदेचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही. तरीही मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करत आहोत, असे पाटील यांनी नमूद केले आहे.

Dhananjay Munde should resign from the ministry

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा !

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी