- पोलिसांनी या प्रकरणी सहकार्य न केल्यास २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा
वृत्तसंस्था
मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर अडचणी काही संपताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वीच गाजलेले बलात्काराच्या आरोपांचे प्रकरण शमते ना शमते तोच आता त्यांच्या समोर आणखी एक नवीन संकट उभा ठाकल्याचे दिसत आहे. कारण, त्यांची दुसरी पत्नी करूणा शर्म – मुंडे यांनी त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.Dhananjay Munde in trouble again; Karuna Munde’s complaint to Mumbai Police Commissioner
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात मागील तीन दिवसांपासून डांबून ठेवले आहे, असा आरोप करूणा यांनी केला आहे. तर, दोन मुलांपैकी एक १४ वर्षांची मुलगी असून ती सुरक्षित नाही, असे देखील करूणा यांचे म्हणणे आहे.
एवढच नाही तर पोलिसांनी या प्रकरणी सहकार्य न केल्यास २० फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणी अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.