DGCA Extended ban On international flights until March 31

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील निर्बंधांचा कालावधी पुन्हा वाढला, DGCA ने 31 मार्चपर्यंत घातली बंदी

कोरोनाच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 मार्चपर्यंत वाढविली आहे. डीजीसीएने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. देशातील कोरोना महामारीमुळे गतवर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित करण्यात आली होती. यापूर्वी ही बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत लागू होती, परंतु गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने होत असलेल्या वाढीमुळे डीजीसीएने आणखी एक महिना ही बंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. DGCA Extended ban On international flights until March 31


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 मार्चपर्यंत वाढविली आहे. डीजीसीएने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. देशातील कोरोना महामारीमुळे गतवर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित करण्यात आली होती. यापूर्वी ही बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत लागू होती, परंतु गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने होत असलेल्या वाढीमुळे डीजीसीएने आणखी एक महिना ही बंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी सायंकाळी डीजीसीएने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली. त्यांनी जारी केलेल्या सूचनांनुसार 31 मार्च 2021 रोजी 11 ते 59 मिनिटांपर्यंत ‘भारतातून’ व ‘भारताकडे येणाऱ्या’ आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. तथापि, डीजीसीएने असेही म्हटले आहे की, विशिष्ट परिस्थितीत निवडक मार्गांवर उड्डाणांना परवानगी दिली जाऊ शकते.कोरोना महामारीमुळे गतवर्षी आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली होती. कोविड-19मुळे सतत बदलत असलेल्या परिस्थितीनुरूप वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. देशांतर्गत उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे, परंतु त्यांची संख्या पूर्वीपेक्षा कमी आहे.

DGCA Extended ban On international flights until March 31

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*