मौनी अमावस्या पर्व : कोरोनावर श्रद्धेची मात … प्रयागराज येथे जगभरातील भाविकांचा मेळा ; माघ मेळ्यात 35 लाख भाविक

प्रयागराजच्या जगप्रसिद्ध माघ मेळ्यात कोरोनाच्या भीतीला श्रद्धा-भक्तीने मात दिली. मौनी अमावास्येनिमित्त स्नानासाठी आलेल्या भाविकांवर पुष्पवृष्टी.


विशेष प्रतिनिधी

प्रयागराज: गुरुवारी माघ मेळ्यातील सर्वात मोठ्या पवित्र स्नान पर्वात सहभागी होण्यासाठी भाविकांनी बुधवारपासूनच येण्यास सुरवात केली होती .रात्री १२ पासून अमावास्येची तिथी प्रारंभ होताच पावन त्रिवेणीत डुबकी घेण्यास सुरुवात झाली. मोठ्या संख्येने भाविकांनी पवित्र गंगेमध्ये स्नान केले.  devotees from all over the world at Prayagraj 35 lakh devotees at Magh Mela

गंगा स्नान करण्यापूर्वी भाविकांनी प्रतिज्ञा घेतली, त्यानंतर गंगेमध्ये स्नान करून सूर्याला जल अर्पण केले .

गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास सुमारे ३५ लाख भाविकांनी पवित्र स्नान केले. कोरोना काळात बहुदा पहिल्यांदाच देश-विदेशातील एवढे लोक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. गुरुवारी भाविकांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी झाली.

मेळा व्यवस्थापनसंबंधी अधिकारी विवेक चतुर्वेदी म्हणाले, स्नानासाठी ८ किमी अंतरात ८ घाट आहेत. ५ हजारांहून जास्त जवान तैनात आहेत. सीसीटीव्ही व ड्रोनच्या साहाय्याने निगराणी केली जात आहे.

devotees from all over the world at Prayagraj 35 lakh devotees at Magh Mela

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*