एका मंत्र्याने दिला होता त्रास, देवेंद्र फडणवीस पाठीशी उभे होते ठाम, तात्याराव लहाने यांचे स्पष्टीकरण

भाजप सरकारच्या काळात आपल्याला एका तत्कालीन मंत्र्याचा त्रास होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली होती. एका मंत्र्याने दिलेला त्रास असताना, भाजप सरकारने आपल्याला त्रास दिला अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या गेल्या, पण वस्तुस्थिती तशी नव्हती, असे स्पष्टीकरण डॉ. तात्याराव लहाने यांनी दिले.Devendra Fadnavis was standing back Tatyarao Lahane explained


प्रतिनिधी

मुंबई : भाजप सरकारच्या काळात आपल्याला एका तत्कालीन मंत्र्याचा त्रास होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली होती.

एका मंत्र्याने दिलेला त्रास असताना, भाजप सरकारने आपल्याला त्रास दिला अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या गेल्या, पण वस्तुस्थिती तशी नव्हती, असे स्पष्टीकरण डॉ. तात्याराव लहाने यांनी दिले.भाजपाच्या सरकारने आपल्याला त्रास दिला असे डॉ. लहाने म्हणाल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. नाशिकच्या वंजारवाडी या गावात डॉ. लहाने एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. मुंडे यांनी विरोधी पक्षनेते असताना केलेल्या मदतीचा उल्लेख लहाने यांनी केला होता.

त्यावेळच्या भाजप सरकारच्या काळातील एका मंत्र्याने आपल्याला त्रास दिला. मात्र आपण फडणवीस यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडल्यानंतर त्यांनी आपल्याला पूर्ण सहकार्य केले. शिवाय राज्यातून मोतीबिंदू उच्चाटन करण्याच्या मोहिमेचे प्रमुखही केले. कालांतराने त्यांनी मंत्रिमंडळात बदल करून गिरीश महाजन यांना वैद्यकीय शिक्षणमंत्री केले, असे लहाने यांनी सांगितले होते.

ज्यावेळी मला त्रास दिला गेला, त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते या नात्याने धनंजय मुंडे यांनी आपला विषय विधान परिषदेतही मांडला. माध्यमांनी आपली बाजू जनतेसमोर आणली. गिरीश महाजन यांनीदेखील आपल्याला वैद्यकीय मंत्री म्हणून कायम पाठिंबा दिला.

वेगवेगळ्या शिबिरांसाठी सहकार्य केले. ही सर्व माहिती आपण त्या कार्यक्रमात सांगितली. मात्र, याच्या बातम्या काही ठिकाणी विपर्यस्त आल्या असे सांगून डॉ. लहाने म्हणाले, एका मंत्र्याने दिलेला त्रास असताना, भाजप सरकारने आपल्याला त्रास दिला अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या गेल्या, पण वस्तुस्थिती तशी नव्हती.

Devendra Fadnavis was standing back Tatyarao Lahane explained

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*