दिल्ली मेट्रोमधून देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर निशाणा


दिल्ली येथे मेट्रोतून प्रवास करतानाच महाविकास आघाडीने मुंबई मेट्रोबाबत घातलेल्या गोंधळाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. कारशेडमुळे घातलेल्या गोंधळामुळे मुंबई मेट्रोने विमानतळावर कधी पोहोचू शकेन, याबाबत शंका वाटते असे त्यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली येथे मेट्रोतून प्रवास करतानाच महाविकास आघाडीने मुंबई मेट्रोबाबत घातलेल्या गोंधळाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. कारशेडच्या मुद्यावरुन घातलेल्या गोंधळामुळे मुंबई मेट्रोने विमानतळावर कधी पोहोचू शकेन, याबाबत शंका वाटते असे त्यांनी म्हटले आहे. Devendra Fadnavis targets Mahavikas from Delhi Metro

फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोतून प्रवास केला आणि कमी वेळेत प्रवास झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र हे सांगत असताना त्यांनी मेट्रो-३ प्रकल्पाच्या रखडलेल्या कामावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विमानतळावर जाण्यासाठी मी आज दिल्ली मेट्रोने प्रवास केला.रस्तेमार्गाच्या तुलनेत मी अतिशय कमी वेळेत मेट्रोने विमानतळावर पोहोचलो. महाविकास आघाडीने कारशेडच्या विषयावर घातलेला गोंधळ पाहता मी असाच मुंबईत मेट्रो-३ ने मी विमानतळावर कधी जाऊ शकेन माहीत नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मेट्रो-३ मार्गिकेच्या आरे कारशेडचा मुद्दा गाजला होता. ही कारशेडसाठी उभारण्यासाठी आरेतील जागा ठरविण्यात आली होती. त्यासाठी सर्व परवानग्याही घेण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी या विरोधात आवाज उठवून आंदोलन छेडले होते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कांजूरमार्ग येथील जागा मिठागाराची असल्याचे केंद्र सरकारने सांगितल्यानंतर हा वाद न्यायालयात गेला होता.

त्यानंतर हायकोर्टाने कांजूरमार्ग येथील कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध घेत आहे.

Devendra Fadnavis targets Mahavikas from Delhi Metro

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती